• Download App
    गुजरातेत लागले 'हिंदूविरोधी केजरीवाल'चे पोस्टर्स : दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर|Posters of 'anti-Hindu Kejriwal' appeared in Gujarat Delhi Chief Minister on Gujarat tour

    गुजरातेत लागले ‘हिंदूविरोधी केजरीवाल’चे पोस्टर्स : दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित वाद गुजरातमध्ये पोहोचला असतानाच आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल आज गुजरात दौऱ्यावर आहेत. संपूर्ण गुजरातमध्ये केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये केजरीवाल यांना ‘मी हिंदू धर्माला वेडा समजतो’ असे म्हणतात दाखवण्यात आले आहे.Posters of ‘anti-Hindu Kejriwal’ appeared in Gujarat Delhi Chief Minister on Gujarat tour

    तसेच दुसऱ्या पोस्टरमध्ये दिल्लीत आयोजित बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमात बोलली गेलेली वक्तव्ये लिहिली आहेत. धर्मांतराच्या कार्यक्रमाबाबत कालपासून भाजप या मुद्द्यावरून आक्रमक आहे.



    भाजप नेत्यांचा केजरीवालांवर निशाणा

    गुजरातमध्ये नुकतीच भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांवर निशाणा साधला होता आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना हटवण्याची मागणी केली होती. या वादाचे गुजरातमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या सगळ्यात गुजरातच्या दौऱ्यावर असलेले केजरीवाल दाहोदमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. संध्याकाळी वडोदरा येथील तिरंगा यात्रेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. हे पोस्टर्स वडोदरात लावण्यात आले होते. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ते हटवले. काही शहरांमध्ये या पोस्टर्सवर हिंदू हितरक्षक समिती कर्णावती असे लिहिले आहे. इतर ठिकाणी नाव लिहिलेले नाही.

    Posters of ‘anti-Hindu Kejriwal’ appeared in Gujarat Delhi Chief Minister on Gujarat tour

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार