• Download App
    सकारात्मक : ९ क्षेत्रांमध्ये रोजगाराची लाट, जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये 3.10 कोटी लोकांना मिळाला रोजगार । Positive News Employment wave in 9 sectors, 3 crore people got employment in July-September 2021

    सकारात्मक : ९ क्षेत्रांमध्ये बंपर रोजगार, जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये ३.१० कोटी लोकांना मिळाली नोकरी

    Employment : श्रम मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर 2021 दरम्यान निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी होता, जो एप्रिल-जून पेक्षा 2 लाखांनी अधिक आहे. Positive News Employment wave in 9 sectors, 3 crore people got employment in July-September 2021


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : श्रम मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर 2021 दरम्यान निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी होता, जो एप्रिल-जून पेक्षा 2 लाखांनी अधिक आहे.

    कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की एप्रिल ते जून 2021 पर्यंत निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार संख्या 3.08 कोटी होती.

    एप्रिल 2021 मध्ये देशात कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यांनी लॉकडाऊन निर्बंध उठवल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. ही नऊ क्षेत्रे म्हणजे उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि रेस्टॉरंट, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा.

    या मालिकेतील हा दुसरा अहवाल आहे. पहिला अहवाल एप्रिल-जून 2021 चा होता. यात 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. अहवाल जारी करताना यादव म्हणाले की, अशा अभ्यासामुळे कामगारांसाठी धोरण तयार करण्यात सरकारला मदत होईल. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेतून भारत लवकरच बाहेर पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

    Positive News Employment wave in 9 sectors, 3 crore people got employment in July-September 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल