वृत्तसंस्था
पणजी / नवी दिल्ली : दिल्लीत संपूर्ण प्रदेशात प्रदूषणाने कहर गाठला आहे. ते चरम सीमेवर पोहोचलो आहे. थेट सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला वेगवेगळे आदेश देऊन प्रदूषणावर तातडीची आणि कायमची उपाययोजना करण्यास सांगितले आहे. एकीकडे राजधानीत हे घडत असताना स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र गोव्यामध्ये आम आदमी पार्टीच्या प्रचारात मग्न आहेत. दिल्लीतील राजवट यांनी आपल्या इतर मंत्र्यांवर सोपवून दिली आहे. Pollution at peak in Delhi; Chief Minister Arvind Kejriwal is engrossed in his campaign in Goa !!
अरविंद केजरीवाल हे काल पासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी काल भाजपचे नेते विश्वजीत राणे यांना भाजप मधून फोडून आम आदमी पार्टीत प्रवेश दिला. आज त्यांनी गोव्यातल्या विविध समाजघटकांची संवाद साधण्याचा कार्यक्रम आखला आहे. यापैकी टॅक्सी चालकांच्या मेळाव्याला अरविंद केजरीवाल यांनी संबोधित केले आहे. केजरीवाल हे दिल्लीची राजवट आपल्या बाकीच्या मंत्र्यांवर सोपवून गोव्यात आले आहेत.
दिल्लीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर तिथले पर्यावरण मंत्री गोपाल राय पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमाराला तोंड देत आहेत. सुप्रीम कोर्टाने जे वेगवेगळे ताशेरे ओढले आहेत त्याला उत्तरे देत आहेत आणि केजरीवाल मात्र जेव्हा दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात संपूर्ण बुडालेली असताना गोव्यात आम आदमी पार्टीचा प्रचार – प्रसार करताना दिसत आहेत.
गोव्यातल्या जनतेला त्यांनी विविध आश्वासने दिली आहेत टॅक्सी चालकांना विशेष सवलती देऊन पर्यटन वाढविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. काही टॅक्सी चालकांनी येथे आम्हाला टॅक्सी माफिया म्हणून हिणवले जाते असे आपल्याला सांगितले, असे अरविंद केजरीवाल त्यांच्या मेळाव्यात म्हणाले आहेत. त्यांची माफिया या संकल्पनेतून मुक्तता करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. दिल्ली प्रदूषणात पूर्ण बुडाली असताना मुख्यमंत्री कुठे आहेत?, असे सवाल अनेक जण सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत.
Pollution at peak in Delhi; Chief Minister Arvind Kejriwal is engrossed in his campaign in Goa !!
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी