• Download App
    कोरोना संकटात कॉँग्रेसकडून राजकारण, आकडे पाहायला तयार नाहीत, अनुराग ठाकूर यांची पी. चिदंबरम यांच्यावर टीका|Politics from Congress in Corona crisis, not ready to see figures, Anurag Thakur's Criticism of P.Chidambaram

    कोरोना संकटात कॉँग्रेसकडून राजकारण, आकडे पाहायला तयार नाहीत, अनुराग ठाकूर यांची पी. चिदंबरम यांच्यावर टीका

    कोरोनाच्या संकटातही काँग्रेसकडून राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या नेतृत्वानं हा दृष्टीकोन आत्मसात केला असून त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. जागतिक संकटामध्ये ही वेळ नक्कीच कठीण आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत आहे. माजी अर्थमंत्र्यांनी कठीण आकड्यांकडे का दुर्लक्ष केलं याची कल्पना नाही, अशी टीका अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर केली आहे.Politics from Congress in Corona crisis, not ready to see figures, Anurag Thakur’s Criticism of P.Chidambaram


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही काँग्रेसकडून राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या नेतृत्वानं हा दृष्टीकोन आत्मसात केला असून त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. जागतिक संकटामध्ये ही वेळ नक्कीच कठीण आहे.

    परंतु भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत आहे. माजी अर्थमंत्र्यांनी कठीण आकड्यांकडे का दुर्लक्ष केलं याची कल्पना नाही, अशी टीका अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर केली आहे.



    भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये उणे ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली.

    यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली असून, सरकारने आता आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि विरोधकांचे ऐकावे असे म्हटले आहे.

    यावर उत्तर देताना ठाकूर म्हणाले, आपली अर्थव्यवस्था एखाद्या द्वीपाप्रमाणे निराळी आहे का? या महासाथीमुळे अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला नाही का? फ्रान्स, जर्मनी, इटली, युकेच्या अर्थव्यवस्थांमध्ये अनुक्रमे ८.२ टक्के, ४.९ टक्के, ८.९ टक्के आणि ९.९ टक्क्यांची घसरण झाली आहे

    हे तुम्हाला माहित नाही का? कॅनडा, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यांसारख्या देशांच्या जीडीपीमध्येही घसरण झाली आहे.ठाकूर म्हणाले, लॉकडाऊनमुळे अनेकांचे जीव वाचवण्यात आपल्याला यश मिळालं.

    त्यानंतर हळूहळू अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी हिरवा झेंडा दाखवत अनलॉक करण्यात आले. आतापर्यंत १.४४ लाख कोटी रूपयांचा जीएसटी जमा झाला असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

    प्रवासी वाहनांची विक्री, दुचाकी वाहनांची विक्री, सीमेंट उत्पादन, आंतरराष्ट्रीय एअर कार्गो अशा सहित अनेक क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे. हाय फ्रिक्वेन्सी मासिक कोअर सेक्टर डेटामधून हेदेखील दिसतं की ८ प्रमुख उद्योगांमध्ये रिबाऊंडही दिसून आले आहे.

    Politics from Congress in Corona crisis, not ready to see figures, Anurag Thakur’s Criticism of P.Chidambaram

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य