• Download App
    उत्तराखंडमध्ये राजकीय पेचप्रसंग, मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून न येता आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा|Political turmoil in Uttarakhand, Tirath Singh Rawat resigns due to non-election within six months of becoming CM

    उत्तराखंडमध्ये राजकीय पेचप्रसंग, मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून न येता आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून: उत्तराखंडमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून येता न आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे.तीरथ सिंह रावत यांची या वर्षी मार्च महिन्यात उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.Political turmoil in Uttarakhand, Tirath Singh Rawat resigns due to non-election within six months of becoming CM

    पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत आमदार होणं गरजेचं आहे. उत्तराखंडमधील दोन जागांवर पोटनिवडणुकही होणार आहे. पण कोरोना संकटामुळे पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने रोखल्या आहेत. यामुळे पोटनिवडणुकीबाबत कुठलीही स्थिती स्पष्ट होत नाही.



    भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर तीरथ सिंह रावत यांना पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. पोटनिवडणुका कधी घ्यायच्या? हा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोग जो काही निर्णय घेईल, तो स्वीकारावा लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.

    त्यानंतर तीरथ सिंह रावत यांनी रात्री ११ वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. रात्री ९.३० वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रावत हे राजीनाम्याबाबत बोलतील असं सांगण्यात येत होतं. पण ते काहीही बोलले नाहीत.

    त्यडेहराडूनमध्ये उद्या केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची म्हणजेस सर्व आमदारांची बैठक होईल. त्यातून एका आमदाराची निवड मुख्यमंत्री म्हणून केली जाईल. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. यापैकी भाजपचे ५७ आमदार आहेत.

    गंगोत्रीची भाजपची एक जागा अजून रिक्त आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर रावत यांना ६ महिन्याच्या कालावधीत विधिमंडळावर निवडून येणं गरजेचं होतं. पण कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे रावत यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. रावत यांनी दिल्लीत शुक्रवारी संध्याकाळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांकडे आपला राजीनामा सादर केला होता.

    तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. घटनात्मक पेच निर्माण झाल्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं रावत यांनी सांगितलं.

    कोरोनाच्या संकटाने निर्माण झालेल्या स्थितीमुळे तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या संकटात पोटनिवडणुका घेणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची शनिवारी बैठक होईल आणि आमदारांमधूनच मुख्यमंत्री निवडला जाईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी सांगितलं.

    तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. डेहराडूनमध्ये शनिवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे आमदारांमधून एकाची निवड मुख्यमंत्रीपदासाठी केली जाईल. राज्यात पुढच्यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ हा फक्त ७ ते ८ महिन्यांचा असणार आहे.

    Political turmoil in Uttarakhand, Tirath Singh Rawat resigns due to non-election within six months of becoming CM

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!