• Download App
    पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, नवज्योत सिंग सिध्दू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा|Political quake in Punjab again, Navjot Singh Sidhu resigns as state president

    पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, नवज्योत सिंग सिध्दू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

    वृत्तसंस्था

    चंडीगड – पंजाब काँग्रेसला काय झाले ते समजत नाही. मुख्यमंत्री बदलून एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सारखा मुख्यमंत्री बदलला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांनीच आज दुपारी अचानक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला आहे.Political quake in Punjab again, Navjot Singh Sidhu resigns as state president

    कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत पोहोचले आहेत. तर तिकडे नवज्योत सिंग सिध्दू यांनी तडकाफडकी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे.



    पंजाबच्या हिताशी समझोता करणार नाही, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. पण काँग्रेसचा एकनिष्ठ सैनिक म्हणून काम करीत राहीन, असे नवज्योत सिंग सिध्दू यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

    Political quake in Punjab again, Navjot Singh Sidhu resigns as state president

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो