• Download App
    पाकिस्तानला पीओकेवासीयांकडून चपराक, काश्मीर एकता दिनी पीओकेतील लोकांनी साजरा केला 'फसवणूक दिवस' । POK people Slaps Pakistan by celebrating Fraud Day On Kashmir Unity Day

    पाकिस्तानला पीओकेवासीयांकडून चपराक, काश्मीर एकता दिनी पीओकेतील लोकांनी साजरा केला ‘फसवणूक दिवस’

    भारतातील निरपराध काश्मिरींचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरने (पीओके) चपराक लगावली आहे. पीओकेमधील लोकांनी काश्मीर एकता दिवस 5 फेब्रुवारी रोजी ‘फसवणूक दिवस’ म्हणून साजरा करत पाकचा निषेध केला आहे. POK people Slaps Pakistan by celebrating Fraud Day On Kashmir Unity Day


    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : भारतातील निरपराध काश्मिरींचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरने (पीओके) चपराक लगावली आहे. पीओकेमधील लोकांनी काश्मीर एकता दिवस 5 फेब्रुवारी रोजी ‘फसवणूक दिवस’ म्हणून साजरा करत पाकचा निषेध केला आहे.

    पीओकेमधील बाग, मोंग आणि हजीरा अशा डझनभर ठिकाणी पाकिस्तानविरोधात मोर्चे काढण्यात आले आहेत. रॅलीमध्ये लोकांनी इस्लामाबादवर काश्मीरबाबत दुटप्पी धोरण स्वीकारल्याचा आरोप केला आहे.

    पाकिस्तानच्या राजधानीपेक्षा श्रीनगर चांगले

    पाकव्याप्त-काश्मीरमधील तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात भाषणे दिली. यावेळी त्यांनी श्रीनगर आणि इस्लामाबादमधील पायाभूत सुविधांची तुलना केली. ते म्हणाले, श्रीनगरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीपेक्षा चांगल्या सुविधा आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान सरकार कसल्या एकजुटीबद्दल बोलत आहे?



    साजिद अमीन या युवा नेत्याने सांगितले की, मी मुझफ्फराबाद, रावळकोट आणि मीरपूरची तुलना श्रीनगरशी करणार नाही, तर श्रीनगरची तुलना इस्लामाबादशी करेन. श्रीनगर शहरात ज्या प्रकारची रुग्णालये आहेत, तशी सुविधा इस्लामाबादमध्ये उपलब्ध नाही. मला असे म्हणायचे आहे की रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये अशी विद्यापीठे आहेत ज्यांची तुलना श्रीनगर विद्यापीठाशी करता येईल.

    पाकिस्तानवर पीओकेमधील संसाधने लुटल्याचा आरोप

    साजिद अमीन यांनी पाकिस्तान सरकारवर पीओकेची संसाधने लुटल्याचा आरोपही केला. “आमची संसाधने लुटली जात आहेत आणि आमच्या नद्या (पाकिस्तान) वळवल्या जात आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचा गंभीर अपव्यय होत आहे,” असे ते म्हणाले.

    इतर राजकीय कार्यकर्त्यांनीही इस्लामाबाद आपल्या राजकीय स्वार्थासाठी काश्मीरचा वापर करत असल्याचा आरोप केला. पाकिस्तान सरकार आपल्या फायद्यासाठी भारतविरोधी चळवळ चालवत असल्याचा तसेच खोटा प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    1990 पासून काश्मीर एकता दिवसाच्या नावावर पाक खोटे बोलतंय

    पाकिस्तान 1990 पासून दरवर्षी 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिवस साजरा करत आहे. याद्वारे तो काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या दहशतवाद्यांना क्रांतिकारक असे संबोधून काश्मीर फुटीरतावादाच्या चळवळीला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे. स्थापनेच्या वर्षापासून भारतविरोधी गट आणि लोक या दिवसाचा वापर जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना स्वतःचे समर्थन करण्यासाठी आणि हिंसाचार कायम ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी करतात.

    POK people Slaps Pakistan by celebrating Fraud Day On Kashmir Unity Day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!