• Download App
    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था त्रुटी : गंभीर कायदेशीर हलचाली तेज; सुप्रीम कोर्टाकडून दखल, भाजप राज्यपालांकडे। PM's security arrangements flawed: serious legal action accelerated; Notice from Supreme Court, to BJP Governor

    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था त्रुटी : गंभीर कायदेशीर हलचाली तेज; सुप्रीम कोर्टाकडून दखल, भाजप राज्यपालांकडे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि झालेले उल्लंघन याबाबत गंभीर कायदेशीर हालचाली तेज झाल्या आहेत. या सर्व प्रकाराची दखल सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांनी घेतली आहे. त्याच बरोबर पंजाब प्रदेश भाजपचे नेते राज भवन वर पोहोचले आहेत. PM’s security arrangements flawed: serious legal action accelerated; Notice from Supreme Court, to BJP Governor

    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटी संदर्भात सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील मनिंदरसिंग यांनी हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्याकडे उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन केंद्र सरकार आणि पंजाब सरकार या दोन्ही सरकारांना नोटीस पाठवावी, असे आदेश दिले. या प्रकरणावर वेगवान सुनावणी होणे अपेक्षित आहे.

    एकीकडे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असताना दुसरीकडे भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अश्विन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत आहे. या भेटीत हे शिष्टमंडळ राज्यपालांना कालच्या पंतप्रधानांच्या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात आणि सुरक्षा व्यवस्थेतील झालेल्या चुकीसंदर्भात संदर्भात संपूर्ण माहिती देत आहे. राज्यपाल यावर आता कोणती कायदेशीर कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    PM’s security arrangements flawed: serious legal action accelerated; Notice from Supreme Court, to BJP Governor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले