• Download App
    कामगारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधान अवघ्या 7 दिवसांत पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; पाठोपाठ बंगलोर आणि चेन्नई दौराही!!|PM to visit Maharashtra again in just 7 days to fulfill dream of workers; Followed by Bangalore and Chennai tour!!

    कामगारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधान अवघ्या 7 दिवसांत पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; पाठोपाठ बंगलोर आणि चेन्नई दौराही!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कामगारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या 7 दिवसांमध्ये पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून ते सोलापुरात रे कामगार वसाहतीचे उद्घाटन करून कामगारांना घरे वाटप करणार आहेत. पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रात नाशिक दौऱ्यावर आलेच होते त्यानंतर आता ते आज सोलापुरात येत आहेत.
    सोलापूर पाठोपाठ आज दिवसभरात पंतप्रधानांचा बंगलोर आणि चेन्नई दौरा देखील होणार आहे.PM to visit Maharashtra again in just 7 days to fulfill dream of workers; Followed by Bangalore and Chennai tour!!



    सकाळी 10.45 च्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15000 घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील.

    कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे.

    देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत

    350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत  आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास 5 वर्षांनी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणार आहेत. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगर हा भव्य प्रकल्प साकारला आहे.

    कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6.00 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.

    PM to visit Maharashtra again in just 7 days to fulfill dream of workers; Followed by Bangalore and Chennai tour!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे