वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 29 जून रोजी दुपारी 2 वाजता ईशान्येकडील पहिल्या आणि देशातील 19व्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुवाहाटी रेल्वे स्थानकावरील उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.PM to flag off virtual green flag for Northeast’s first Vande-Bharat train, covering 411 km from Assam to Bengal in 5.30 hours
ही ट्रेन आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीपर्यंत धावेल आणि 411 किलोमीटरचे अंतर 5 तास 30 मिनिटांत कापेल. सध्या सुपरफास्ट ट्रेनने हे अंतर कापण्यासाठी 6 तास लागतात.
गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडीला धावणारी ही वंदे भारत ट्रेन न्यू अलीपुरद्वार, कोक्राझार, न्यू बोंगाईगाव आणि कामाख्या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ट्रेन न्यू-जलपाईगुडी जंक्शनवरून सकाळी 6:10 वाजता सुटेल आणि दुपारी गुवाहाटीला पोहोचेल. ट्रेन गुवाहाटी येथून 4:30 वाजता सुटेल आणि सुमारे 10:20 वाजता न्यू जलपाईगुडीला पोहोचेल.
तत्पूर्वी, 25 मे रोजी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडच्या पहिल्या आणि देशातील 18व्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंडच्या विकासामुळे भारताच्या विकासालाही मदत होईल. देश आता थांबणार नाही, तो वंदे भारताच्या गतीने पुढे जात आहे आणि पुढेही वाढणार आहे.
वंदे भारतमुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयी वाढल्या
जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. येथे 1.25 लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर दररोज 11 हजारहून अधिक ट्रेन धावतात. या गाड्यांमधून दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. इतका मोठा आणि लोकांशी जोडलेला असल्यामुळे भारतात रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2016 मध्ये मोदी सरकारने ही 92 वर्षे जुनी प्रथा बंद केली होती.
PM to flag off virtual green flag for Northeast’s first Vande-Bharat train, covering 411 km from Assam to Bengal in 5.30 hours
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!