विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशाची निवडणूक २०२२ मध्ये आहे. पण भाजपने आत्तापासूनच त्याची जोरदार तयारी चालू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर ऐन गणेशोत्सवात मिशन उत्तर प्रदेश सुरू करणार असून अलिगडमध्ये प्रख्यात क्रांतिकारक राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाच्या राज्य विद्यापीठाची कोनशिला ते १४ सप्टेंबरला बसविणार आहेत. मिशन उत्तर प्रदेशसाठी त्यांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडला आहे. PM narendra modi will start Mission UP from 14 sept 2021 from alighad, he will hold 30 rallies across Uttar Pradesh
२०२१ मध्ये पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांनंतर देशातली राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित चार राज्यांमध्ये आणि पंजाब या काँग्रेस शासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून
दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार असल्याचे समजते आहे.
यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार आहेत. सल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तर प्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. यात काही विशेष नाही. पण या निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न कितपत सफल होतात. याची लिटमस टेस्ट होणार आहे.
उत्तर प्रदेशसारखे राज्य आपल्या ताब्यात असावं, यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दसऱ्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात ३० हून जास्त सभा घेणार आहेत. त्यामध्ये १४ सप्टेंबरला अलिगड आणि २६ सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
PM narendra modi will start Mission UP from 14 sept 2021 from alighad, he will hold 30 rallies across Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर
- West Bengal Bypolls : पोटनिवडणुकीसाठी ममतांचा भवानीपूरमधून अर्ज दाखल, भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांचे आव्हान
- भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले – नेहरूंच्या तुष्टीकरणामुळे काश्मीरची समस्या कायम
- मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी
- स्पेनमध्ये धार्मिक सौहार्दाचे उदाहरण, गणपती बाप्पाची मिरवणूक चर्चमध्ये दाखल, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला व्हिडिओ