• Download App
    अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी । PM Narendra Modi To Participate In G20 Leaders Summit On Afghanistan Situation On Tuesday

    G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी-20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी

    G20 Leaders Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत मंगळवारी होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित होणाऱ्या या परिषदेत तालिबान्यांनी सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे. PM Narendra Modi To Participate In G20 Leaders Summit On Afghanistan Situation On Tuesday


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत मंगळवारी होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित होणाऱ्या या परिषदेत तालिबान्यांनी सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, पंतप्रधान मोदीदेखील या परिषदेत सहभागी होतील. मंत्रालयाने सांगितले की, या परिषदेच्या अजेंडामध्ये अफगाणिस्तानमधील मानवतावादी गरजांना प्रतिसाद, सुरक्षा परिस्थिती, दहशतवादाविरोधातील लढा आणि मानवाधिकार चर्चा यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

    मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20च्या इटालियन प्रेसिडेन्सीच्या आमंत्रणावर 12 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील जी 20 नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत सहभागी होतील. G-20चे सध्याचे अध्यक्ष असलेल्या इटलीद्वारे ही परिषद आयोजित केली जात आहे.

    याआधी, पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर एससीओ सीएसटीओ (कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन) आउटरीच शिखर परिषदेत भाग घेतला होता. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींबाबत भारताची बाजू मांडली होती. भारतासारख्या शेजारील देशांवर याचा सर्वात मोठा परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले होते. त्याचवेळी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये अफगाणिस्तानबाबत जी-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली.

    PM Narendra Modi To Participate In G20 Leaders Summit On Afghanistan Situation On Tuesday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य