• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे जो बायडेन, ब्रिटनचे बोरिस जॉन्सन यांना टाकले मागे |PM narendra Modi named worlds most admired leader

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे जो बायडेन, ब्रिटनचे बोरिस जॉन्सन यांना टाकले मागे 

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना टाकले मागे टाकले आहे.PM narendra Modi named worlds most admired leader

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशाबरोबरच परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकलं आहे.



    मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुव्हल रेटिंग हे सर्वाधिक म्हणजेच ७० टक्के इतरं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओबराडोर (६६ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान पारियो द्रागी (५८ टक्के) यांचा क्रमांक आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एन्जेला मार्केल (५४ टक्के) या पाचव्या स्थानावर, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (४४ टक्के) हे सहाव्या स्थानावर आहेत.

    रेटिंगमध्ये कोणाला स्थान?

    नरेंद्र मोदी: ७० टक्के
    लोपेज ओबराडोर : ६६ टक्के
    मारियो द्रागी : ५८ टक्के
    एन्जेला मार्केल: ५४ टक्के
    स्कॉट मॉरिसन: ४७ टक्के
    जो बायडेन: ४४ टक्के
    जस्टिन ट्रूडो: ४३ टक्के
    फुमियो किशिदा: ४२ टक्के
    मून जे-इन: ४१ टक्के
    १० बोरिस जॉन्सन: ४० टक्के
    ११ पेड्रो सांचेज: ३७ टक्के
    १२ इमॅन्युअल मॅक्रोन: ३६ टक्के
    १३ जायर बोल्सोनारो: ३५ टक्के

    मॉर्निंग कन्सल्टद्वारे प्रौढांच्या मुलाखतीद्वारे हे रेटिंग दिलं जातं. मॉर्निंग कन्सल्टनं भारतात यासाठी २१२६ जणांची मुलाखत घेतली. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निग कन्सल्टनं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युके आणि अमेरिकेच्या बड्या नेत्याचं रेटिंग ट्रॅक केलं आहे.

    PM narendra Modi named worlds most admired leader

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!