वृत्त्संस्था
पॅरिस : PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील नीस शहरात दाखल झाले असून आज ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर ‘भारत इनोव्हेट्स’ या जागतिक उपक्रमाचे उद्घाटनही मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्ते होणार आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.PM Narendra Modi
13 ते 18 जूनदरम्यान पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि Slovakia दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची ही फ्रान्सची सातवी भेट आहे. फ्रान्स दौऱ्यानंतर ते स्लोव्हाकियाला रवाना होणार असून तेथील पंतप्रधान Robert Fico आणि राष्ट्राध्यक्ष Peter Pellegrini यांची भेट घेतील. विशेष म्हणजे, 1993 मध्ये स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच स्लोव्हाकिया भेट ठरणार आहे.PM Narendra Modi
17 जूनला ट्रम्प-मोदी आमनेसामने
G7 शिखर परिषदेदरम्यान 17 जून रोजी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. व्हाईट हाऊसनेही या भेटीला दुजोरा दिला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीनंतर तब्बल 16 महिन्यांनी हे दोन्ही नेते पुन्हा प्रत्यक्ष भेटणार आहेत.
G7 परिषदेत जगातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
G7 परिषदेसाठी ट्रम्प 15 जून रोजी फ्रान्समध्ये दाखल होणार आहेत. परिषदेदरम्यान ते मॅक्रॉन, Volodymyr Zelenskyy, कतारचे अमीर, UAEचे राष्ट्राध्यक्ष तसेच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष Abdel Fattah el-Sisi यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
‘भारत इनोव्हेट्स’ म्हणजे काय?
‘भारत इनोव्हेट्स’ हा शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी जागतिक उपक्रम आहे. भारतीय स्टार्टअप्स, IITs, IISc, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना जागतिक गुंतवणूकदार, कंपन्या आणि संशोधन संस्थांशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 14 ते 16 जूनदरम्यान नीसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
G7 म्हणजे काय?
G7 म्हणजे जगातील सात विकसित अर्थव्यवस्थांचा समूह. यात United States, France, United Kingdom, Japan, Italy, Canada आणि Germany या देशांचा समावेश आहे. 2014 पर्यंत हा समूह G8 म्हणून ओळखला जात होता; मात्र रशियाला वगळल्यानंतर त्याचे G7 असे नामकरण करण्यात आले.
G7 परिषदेत मोदींचा विक्रम
2019 पासून जवळपास प्रत्येक G7 परिषदेसाठी भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. यंदाच्या सहभागासह पंतप्रधान मोदी सातव्यांदा G7 परिषदेत सहभागी होत असून, भारतीय पंतप्रधानांमध्ये हा सर्वोच्च सहभाग ठरणार आहे.
भारत-फ्रान्स संरक्षण भागीदारी अधिक मजबूत
भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फ्रान्स हा रशियानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार मानला जातो. भारताने फ्रान्सकडून Dassault Rafale लढाऊ विमाने, Mirage 2000 आणि Scorpène-class submarine यांसारखी महत्त्वाची संरक्षण साधने खरेदी केली आहेत.
PM Narendra Modi in France for G7 Summit; Strategic Bilateral Meet With Emmanuel Macron
महत्वाच्या बातम्या
- FSSAI : मैगीवर पुन्हा प्रश्नचिन्ह? कीडे आढळल्याच्या तक्रारीनंतर FSSAI ची नेस्लेला नोटीस; KFC आणि फ्लिपकार्टकडूनही मागवला खुलासा
- Donald Trump : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने नेतान्याहू चक्रावले? इराणबाबत अमेरिकेची नवी भूमिका; पश्चिम आशियात मोठ्या घडामोडी
- Elon Musk : इलॉन मस्क ठरले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; स्पेसएक्समुळे संपत्तीत विक्रमी झेप, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
- मोदींची तुलना नेहरूंबरोबर नकोच; पण पवारांची तुलना कुणाबरोबर करता येईल??