• Download App
    निती आयोगाच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली, पण मोदींनी सगळ्या राज्यांच्या विकास गतीची चर्चा केली!!PM Narendra Modi chaired the 8th Governing Council Meeting of NITI Aayog earlier today.

    निती आयोगाच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली, पण मोदींनी सगळ्या राज्यांच्या विकास गतीची चर्चा केली!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली पण तरी देखील देशातल्या सर्व राज्यांनी पाठविलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्यांच्या विकास गतीची चर्चा केली. नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली. PM Narendra Modi chaired the 8th Governing Council Meeting of NITI Aayog earlier today.

    नीती आयोगाच्या बैठकीला 11 राज्यांचे मुख्यमंत्री आले नव्हते. पण देशातल्या प्रत्येक राज्यांच्या विविध विषयांवरच्या सूचना नीती आयोगाकडे आधीच आल्या होत्या. त्या आधारे आजच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत इज ऑफ डूइंग बिजनेस, आरोग्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, महिला सशक्तिकरण, पायाभूत सुविधा आणि पंतप्रधान गतिशक्ती योजना या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. या सर्व विषयांसंदर्भात देशातल्या सर्व राज्यांनी नीती आयोगाकडे आपल्या लिखित सूचना आणि मागण्या आधीच केल्या होत्या, असे सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.

    याचा अर्थ देशातल्या 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय कारणांसाठी आणि सध्याच्या राजकीय वातावरणात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ गेलो असे परसेप्शन तयार होऊ नये म्हणून दांडी मारल्याचे दिसले.

     

     

    आजच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समावेश होता. यापैकी अरविंद केजरीवाल आणि चंद्रशेखर राव यांनी एकमेकांच्या आजच भेटी घेतल्या. ममता बॅनर्जी आणि अशोक गेहलोत हे आपापल्या राज्यांमध्ये बिझी राहिले. पण तरीदेखील त्यांच्यासह सर्व राज्यांनी केलेल्या सूचनांच्या आधारावरच नीती आयोगाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.

    PM Narendra Modi chaired the 8th Governing Council Meeting of NITI Aayog earlier today.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!