वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या पथकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. एअर पिस्तूल विभागात नेमबाजीत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अवनी लेखराचे पंतप्रधानांनी खास कॉल करून तिचे अभिनंदन केले. करोडो भारतीयांसाठी अवनी प्रेरणास्थान ठरेल, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अवनी सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली पहिली महिला ठरल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असे मोदी म्हणाले.PM Narendra Modi also spoke to Yogesh Kathuniya over the phone and congratulated him on the silver medal win at Tokyo Paralympics
त्यानंतर पंतप्रधानांनी थाळीफेकीत रौप्य पदक मिळवलेल्या योगेश कथुनिया यांना कॉल करून त्याचे अभिनंदन केले. योगेशची आई मीना देवी यांनी त्याच्या खेळासाठी घेतलेल्या मेहनतीचा पंतप्रधान मोदींनी खास उल्लेख केला तेव्हा योगेश भावनावश झाला. अवनी आणि योगेश यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
पदक विजेत्या ऑलिम्पिक खेळाडूंना स्वतः कॉल करून प्रोत्साहन देण्याची वेगळी पद्धत पंतप्रधान मोदी यांनी अवलंबली आहे. परंतु, भारतीय महिला हॉकी टीम ब्राँझ पदक जिंकू शकली नाही. परंतु त्यांनी फायटिंग स्पिरिटने खेळ केला. त्याबद्दलही पंतप्रधानांनी खास कॉल करून आपल्या महिला टीमचे अभिनंदन केले होते आणि त्यांना प्रोत्साहन दिले होते.
PM Narendra Modi also spoke to Yogesh Kathuniya over the phone and congratulated him on the silver medal win at Tokyo Paralympics
महत्त्वाच्या बातम्या
- टोकियोमध्ये पदकांची लयलूट; देवेंद्र झांजरिया, योगेश कथुनिया यांना रौप्य पदक; तर सुंदर सिंगला ब्राँझपदक
- Jai Kanhaiya Lal ki : गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले ; पहा फोटो
- योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी
- Tokyo Paralympics 2020 : अवनी लेखराने घेतला “सुवर्णवेध”; नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक