• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींची वडनगरची शाळा बनणार देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान; 750 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सरकार घडविणार सहल!! PM Modi's school in Vadnagar to be Prerna for students

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची वडनगरची शाळा बनणार देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान; 750 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सरकार घडविणार सहल!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोणत्याही सुप्रसिद्ध व्यक्तीला कोणत्याही सुप्रसिद्ध व्यक्तीला आपल्या शाळेचे दिवस कायम आठवतात. त्या सोनेरी आठवणीत ती व्यक्ती कायमची रंगून जाते. तसेच जगभरातले मोठे नेतेही आपल्या शाळांना कधीच विसरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक नेते आहेत. PM Modi’s school in Vadnagar to be Prerna for students

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधल्या वडनगर मध्ये ज्या शाळेत शिकले, ती शाळा आता आरटीओ लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जतन केली आहे. आता हीच शाळा देशातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

    केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय देशभरातल्या 750 जिल्ह्यांमधील शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांना वडनगरची सहल घडविणार आहे. त्यांना पंतप्रधान मोदींची शाळा दाखविणार आहे. त्याच वेळी वडनगर मध्ये तयार होत असलेल्या जागतिक वारसा संग्रहालयाची सफर देखील विद्यार्थ्यांना घडविणार आहे.

    नेहरू, इंदिरा, वाजपेयी, मोदी भाषणे

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानातून विद्यार्थी वयोगटातल्या अनेकांना वेगवेगळ्या राज्यांची सहल घडविली जात आहे. आता त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश सांस्कृतिक मंत्रालयाने केला आहे. पंतप्रधान मोदी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत आठ वर्ग खोल्या आहेत आणि सध्या तिथे स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज द्वारे शिक्षण दिले जात आहे. देशभरातल्या विद्यार्थ्यांना ही शाळा दाखवून तेथील वेगवेगळ्या ज्ञान कक्षा रुंदावणाऱ्या गोष्टींचे अवलोकन विद्यार्थी करू शकतो. तुझे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची माहिती फोटो फिल्म प्रदर्शित केले आहेत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक भाषणे देखील तिथे दाखवली जातील.

     वडनगरचे ऐतिहासिक संग्रहालय

    त्याचबरोबर वडनगरच्या ऐतिहासिक परिसरात आरटीओ लॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मानवी इतिहासातील काही हजार वर्षांची संस्कृती गवसली आहे. तेथे सुमारे 55 हजार वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि प्राग ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. त्याचे एक संग्रहालय केंद्र सरकार तिथे उभारत आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन देखील या वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान मोदींच्या हस्तेच होणार आहे. या संग्रहालयाची सफर करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

    PM Modi’s school in Vadnagar to be Prerna for students

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कोलकात्यातील विधी विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची सुओ मोटो दखल, पोलीस आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

    Jaishankar : SCO संयुक्त निवेदन- राजनाथांची सही नाही, जयशंकर म्हणाले; निवेदनात दहशतवादाचा उल्लेख नसावा असे एका देशाला वाटत होते

    RSS Hosabale : ‘राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील समाजवादी-धर्मनिरपेक्ष शब्दांवर चर्चा व्हावी’; RSSचे होसाबळे म्हणाले- आणीबाणीच्या काळात संसदेच्या परवानगीशिवाय हे जोडले गेले