• Download App
    पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेला भेट देणार, आमसेभेतही भाषण होण्याची शक्यता PM Modi will visit USA very soon

    पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेला भेट देणार, आमसेभेतही भाषण होण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये ‘क्वाड’ गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही बैठक घ्यावी की नाही, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, तसे झाल्यास मोदी यांचा अमेरिका दौरा निश्चिबत मानला जात आहे. PM Modi will visit USA very soon

    अमेरिकेत सत्ताबदल झाल्यापासून मोदी अमेरिकेला गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या या संभाव्य दौऱ्याला भारताच्या दृष्टीने कमालीचे महत्व आलेले आहे. समजा ही भेट झाली तर मोदी प्रथमच नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा करतील. आधीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी मोदी यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते.



    या दौऱ्यात क्वाड बैठकीबरोबरच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोदींचे भाषण आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर द्वीपक्षीय चर्चा हे मुद्दे लक्षात घेऊनही दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. ‘क्वाड’ गटातील जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे राजीनामा देणार असल्याने नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बैठक होण्याबाबत शंका व्यक्त होत आहे.

    PM Modi will visit USA very soon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र