• Download App
    PM मोदी पिथौरागढमध्ये आदि कैलासचे दर्शन घेणार; येथे भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान; इथून 20 किमी दूर आहे चीनची सीमा |PM Modi will visit Adi Kailas in Pithoragarh; First Indian Prime Minister to visit here; China border is 20 km away from here

    PM मोदी पिथौरागढमध्ये आदि कैलासचे दर्शन घेणार; येथे भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान; इथून 20 किमी दूर आहे चीनची सीमा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान पिथौरागढमधील चीन सीमेवर असलेल्या आदि कैलास पर्वत आणि पार्वती तालला भेट देतील आणि येथे ध्यान करतील.PM Modi will visit Adi Kailas in Pithoragarh; First Indian Prime Minister to visit here; China border is 20 km away from here

    नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, जे उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील आदि कैलास पर्वताला भेट देणार आहेत. पंतप्रधान ज्या ठिकाणाहून कैलास पर्वत पाहतील त्या ठिकाणाचे नाव जोलिंगकॉंग आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 15000 फूट आहे. इथून 20 किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते. यानंतर पिथौरागढमध्ये जाहीर सभा होणार आहे.



    उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील 18 हजार फूट उंच लिपुलेख पर्वतावरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. येथून पर्वताचे हवाई अंतर 50 किलोमीटर आहे.

    पंतप्रधानांच्या भेटीची टाइमलाइन

    12 ऑक्टोबरला सकाळी पंतप्रधान मोदी पिथौरागढ जिल्ह्यातील जोलिंगकॉंग येथे असलेल्या पार्वती कुंडला भेट देतील. यानंतर पंतप्रधान जोलिंगकाँगमध्ये लष्कर, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर पंतप्रधान आदि कैलास व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलास शिखराला भेट देतील. दुपारी 12 वाजता ते जागेश्वर धाम मंदिरात पूजा करतील.

    पंतप्रधान दुपारी 2.35 वाजता पिथौरागढच्या स्पोर्ट्स स्टेडियमवर पोहोचतील, जिथे ते ‘लोकल फॉर व्होकल’ अंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनात सहभागी होतील. यानंतर पीएम मोदी पिथौरागढमध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि जनसभेला संबोधित करतील.

    याआधी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर येणार होते, मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट म्हणाले की, आता पंतप्रधानांचा दौरा केवळ एक दिवसाचा आहे.

    PM Modi will visit Adi Kailas in Pithoragarh; First Indian Prime Minister to visit here; China border is 20 km away from here

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला