वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी उद्याच्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमध्ये मधल्या काही गोष्टी लोकार्पण करणार आहेत. PM Modi will release the next instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 9th August via video conferencing.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २ ची सुरुवात आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २ या योजनेची सुरुवात उत्तर प्रदेशातील महोबा येथून करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते महिलांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात येईल. यावेळी पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहेत.
तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप करण्यात येणार असून ९ कोटी 75 लाख शेतकरी याचे लाभार्थी ठरणार आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात 190750 कोटी रुपये एवढ्या निधीची रक्कम मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात येईल.
PM Modi will release the next instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 9th August via video conferencing.
महत्वाच्या बातम्या
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…
- FIH Ranking : Tokyo Olympic मधील ऐतिहासिक कामगिरीचं फळ ! भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर तर महिला संघाची आठव्या स्थानावर उडी
- बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी
- मोदी सरकारच्या TOPS पॉलिसीमुळे चमकू लागलेत भारतीय खेळाडू… काय आहे ही पॉलिसी…??