वृत्तसंस्था
नवी दिल्ली – Happy Akshay trutiya; पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हफ्ता उद्या ता. १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. PM Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 14th May
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी ११.०० वाजता विडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ९.५ कोटी शेतकरी कुटंबीयांच्या खात्यात १९००० कोटी रुपये ते जमा करणार आहेत.
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात जमा होणारी ही रक्कम शेतकऱ्यांना नक्कीच लाभकारक ठरणार आहे. तसेच या काळात अन्य आर्थिक क्षेत्रांना लॉकडाऊन आणि विविध कठोर निर्बंधांचा फटका बसलेला असताना करोडो शेतकऱ्यांच्या कष्टाच्या बळावर कृषी क्षेत्राने मात्र उत्पादनाची मोठी झेप घेतली आहे. कृषी उत्पादनाने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे.
याविषयी केंद्रातील मोदी सरकारला कृतज्ञता वाटते आहे म्हणून उद्याचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त त्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी जमा करण्यासाठी निवडण्यात एक प्रकारे समयसूचकता दाखविण्यात आली आहे.
PM Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 14th May
महत्त्वाच्या बातम्या
- Project Heal India : किरण खेर आजारी असुनही अनुपम खेर यांचा मदतीसाठी पुढाकार ; वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप अमेरिकेतून दाखल
- सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??
- कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; 22.4 टक्के वाढ
- महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस
- उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक