Cooch Behar incident : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी सिलीगुडीमध्ये जनसभेला (PM Modi Speech in Siliguri) संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. PM Modi says, ‘Cooch Behar incident is tragic, Didi-Trinamool can not act arbitrarily, culprits should be punished
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी सिलीगुडीमध्ये जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जिथे कुठे नजर जातेय तिथेच माणसंच माणसं दिसताहेत. भरउन्हात लोकं उभे आहेत. त्यांचे हे तप वाया जाणार नाही. आम्ही विकास करून तुमच्या प्रेमाची परतफेड करू. कूचबिहारमध्ये जे झाले ते खूप दु:खद आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त करतो. भाजपच्या बाजूने जनतेचा पाठिंबा पाहून दीदी व त्यांचे गुंड संतापले आहेत. खुर्ची जाताना दिसत असल्याने दीदी आता या पातळीवर उतरल्या आहेत. मला दीदी, टीएमसी आणि त्यांच्या गुंडांना स्पष्टपणे सांगायचे आहे की, दीदी आणि टीएमसीच्या मनमानीला बंगालमध्ये चालू दिले जाणार नाही. कूचबिहार घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे. ते म्हणाले की, असे हिंसाचार आणि निवडणुकीत अडथळा आणण्याचे प्रयत्न तुम्हाला वाचवू शकणार नाहीत.
पीएम मोदी म्हणाले की, मी चहा विक्रेता आहे हे आपणास माहिती आहे. संपूर्ण उत्तर बंगालने मला खूप आशीर्वाद दिले आहेत. उत्तर बंगालच्या भूमीने जाहीर केले की, टीएमसी सरकार जात आहे. भाजप सरकार येत आहे. बंगालमध्ये नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षात वाईटावर चांगल्या गोष्टी विजय मिळवणार आहेत. भाजप जिंकणार आहे.
PM Modi says, ‘Cooch Behar incident is tragic, Didi-Trinamool can not act arbitrarily, culprits should be punished
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!
- कुचबिहारमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला; निवडणूक हिंसाचारात ४ ठार; निवडणूक आयोगाने रिपोर्ट मागविला; तृणमूळच्या नेत्यांचा सुरक्षा दलांवरच आरोप
- आरोग्यमंत्र्यांच्या दाव्यानंतरही रेमडीसीवर मिळेना, नाशिकमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर
- राजकीय वैरभाव टोकाला गेलेल्या बंगालमधले राजकीय सद्भावाचेच एक वेगळे चित्र!!
- बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्र्यांचा सर्वपक्षीय विचार विनिमय, सोनियांची काँग्रेस मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा