प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणापलिकडे अनेक तरुणांचे आयकॉन आहेत. अनेक तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे… पण ते स्वतः कोणाकडून प्रेरित होतात, हे त्यांनी आज स्वतः सांगितले आहे.PM Modi: Prime Minister Narendra Modi himself inspired by meeting Divyang painter Ayush Kundal
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाह गावातील दिव्यांग चित्रकार आयुष कुंडल यांची भेट घेऊन मी धन्य झालो. आयुष सारख्या व्यक्तीला भेटून मला प्रेरणा मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आयुष कुंडल हा दिव्यांग चित्रकार आहे. पायातील बोटांमध्ये ब्रश धरून तो आपल्या कुंचल्याची किमया कॅनव्हास वर साकार करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आयुष कुंडल याने भेटू घेऊन स्वामी विवेकानंद यांचे चित्र त्यांना भेट दिले. या चित्रासह आयुष कुंडल याच्याबरोबर फोटो काढून घेऊन मोदींनी तो आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे. आयुष कुंडल याच्यासारख्या दिव्यांग किमयागाराला भेटून मी प्रेरित झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर आयुषला मी ट्विटरवर फॉलो करतो, असेही पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यापूर्वी आयुष कुंडल एकदा मिलेनियम सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील भेटला आहे. बच्चन यांना देखील त्याने आपण काढलेले एक उत्तम चित्र भेट दिले आहे.
PM Modi: Prime Minister Narendra Modi himself inspired by meeting Divyang painter Ayush Kundal
महत्त्वाच्या बातम्या
- Specially-Abled Painter : दोन्हीकडे ‘ नरेंद्र ‘!२५ वर्षीय आयुष कुंडलचे फॅन झाले पंतप्रधान मोदी ; माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण-करणार ट्विटरवर फॉलो…
- Dhananjay Munde Vs Karuna Munde : धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि अनेक बायका लपवल्या आहेत;करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप
- PARAMBIR SINGH : परमबीर यांच्याविरुद्ध तक्रारींचा तपास CBI करणार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्य सरकारला दणका
- आमने – सामने : कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही संजय राऊत ! तुमच्या वक्तव्याची जागा केराच्या टोपलीत ! सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारलं…