• Download App
    PM modi : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस ; मोदींनी विनायक राऊतांना विचारले…|PM Modi: PM Modi inquires about CM Thackeray's health; Modi asks Vinayak Raut

    PM modi : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस ; मोदींनी विनायक राऊतांना विचारले…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.PM Modi: PM Modi inquires about CM Thackeray’s health; Modi asks Vinayak Raut

    दिल्लीत राज्यसभेच्या सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची अनौपचारिक भेट घेतली त्यावेळी राज्यातील खासदारही उपस्थित होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.



    काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे काही दिवस ते रुग्णालयात दाखल होते. अधिवेशाच्या अगोदरच्या चहापानाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती.

    गेल्या 29 नोव्हेंबरपासून दिल्लीत संसदीय अधिवेशन सुरू होते, ते आज संपले आहे. यावेळी लोकसभेमध्ये अधिवेशन काळात 82% कामकाज झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    तर राज्यसभेत फक्त 47% कामकाज झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.या अधिवेशनात विरोधी पक्षातील 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले, गेल्या अधिवेशनात गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

    खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा गाजला

    निलंबन झालेल्या खासदारांमध्ये राज्यातील दोन खासदारांचा समावेश होता, शिवसेना खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली, त्यामुळे संसदेत पुन्हा मोठा गदारोळ झाल्याचेही दिसून आले. बारा खासदारांच्या निलंबनामुळे कामकाजात मोठे अडथळे निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले.

    यावेळी लोकसभेच्या कामकाजात 9 विधेयक संमत करण्यात आली. तसेच याच अधिवेशनात तिन्ही कृषी कायदेही मागे घेण्यात आले.

    याच अधिवेशनात मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे बंधनकारक करण्याचा ठराव मांडण्यात आला.

    PM Modi: PM Modi inquires about CM Thackeray’s health; Modi asks Vinayak Raut

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील राम मंदिरात नमाज पठणाचा प्रयत्न, कॅम्पसमध्ये घुसलेल्या 2 तरुण आणि एका तरुणीला पकडले

    Ajit Doval : अजित डोभाल म्हणाले- युद्ध शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरणासाठी लढले जाते, सध्याच्या नेतृत्वाने 10 वर्षांत देश बदलला

    mohan bhagwat : हिंदू समाज शौर्याने नाही तर फुटीमुळे हरला, सरसंघचालक म्हणाले- हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, आपण एक झालो की त्यांचे तुकडे होतील