• Download App
    बुद्ध पौर्णिमेस पंतप्रधानांचे संबोधन : पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद । PM Modi Keynote Speech on Occasion Of Virtual Vesak Global Celebrations On Buddha Purnima

    पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद

    Buddha Purnima : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनला संबोधित केले. आंतरराष्ट्रीय बौद्ध कन्फेडरेशन (आयबीसी) च्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या व्हर्च्युअल कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघटनांच्या प्रमुखांनी भाग घेतला. श्रीलंका आणि नेपाळच्या पंतप्रधानांव्यतिरिक्त जगभरातील 50 हून अधिक बौद्ध धार्मिक नेतेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. PM Modi Keynote Speech on Occasion Of Virtual Vesak Global Celebrations On Buddha Purnima


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनला संबोधित केले. आंतरराष्ट्रीय बौद्ध कन्फेडरेशन (आयबीसी) च्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या व्हर्च्युअल कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघटनांच्या प्रमुखांनी भाग घेतला. श्रीलंका आणि नेपाळच्या पंतप्रधानांव्यतिरिक्त जगभरातील 50 हून अधिक बौद्ध धार्मिक नेतेही या सोहळ्यात सहभागी झाले होते.

    बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी बुद्ध पौर्णिमा हा सर्वात मोठा सण आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबोडिया, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि भारतात आहेत. या दिवशी ते बोधीवृक्षाची पूजा करतात. श्रीलंकेत हा दिवस वेसाक म्हणून साजरा केला जातो.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आणि देश कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, “कोरोना महामारीच्या रूपात आपल्याकडे अभूतपूर्व संकट आहे. बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, मी प्रार्थना करतो की आपल्या ऐक्यातून आणि एकत्रित प्रयत्नातून आपण या महामारीतून यशस्वीरीत्या बाहेर पडून लोकांच्या कल्याणाच्या मार्गावर पुढे जाऊ शकू.” ते म्हणाले, “बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व सहकारी नागरिकांना आणि जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना शुभकामना देतो.”

    PM Modi Keynote Speech on Occasion Of Virtual Vesak Global Celebrations On Buddha Purnima

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!