• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक राज्यांमधले "डेली पॅसेंजरच"; तृणमूलच्या खासदाराची गोवा दौऱ्यावरून शेलकी टीका!! PM Modi is daily passenger of election states, allaged TMC MP Sudip Banerjee

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक राज्यांमधले “डेली पॅसेंजरच”; तृणमूलच्या खासदाराची गोवा दौऱ्यावरून शेलकी टीका!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात त्या राज्यांमध्ये नेहमीच जातात. ते तिथे “डेली पॅसेंजर”सारखे असतात. हे आपण पश्चिम बंगालच्या निवडणूकीत अनुभवले आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये तृणमूळ काँग्रेसचे खासदार सुधीर बॅनर्जी यांनी टीकास्त्र सोडले आहे.PM Modi is daily passenger of election states, allaged TMC MP Sudip Banerjee

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोवा मुक्ती दिनाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त पणजीच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये त्यांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ते गोव्यातील जनतेला संबोधित करत आहेत. तिथे गोव्याच्या विकास संदर्भातल्या विविध घोषणा ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूळचे खासदार सुदीप बॅनर्जी यांनी डेली पॅसेंजर या शब्दांमध्ये मोदींवर टीका केली आहे.

    हेच ते गोवा राज्य आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी दोन दौरे केले आहेत. तेथे दोन – तीन दिवस तळ ठोकले आहेत. तेथेच त्यांनी भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष सोडला आहे. म्हणजे ममता बॅनर्जी यांचे दोन गोवे दौरे हे “डेली पॅसेंजर”सारखे नाहीत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2019 नंतरचा पहिलाच 2021 चा डिसेंबर मधला दौरा मात्र तृणमूळ काँग्रेसचा खासदारांना “डेली पॅसेंजर”सारखा वाटत आहे…!!

    PM Modi is daily passenger of election states, allaged TMC MP Sudip Banerjee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asiya Andrabi : काश्मिरी फुटीरतावादी आसिया अंद्राबी दहशतवाद प्रकरणात दोषी, NIA कोर्टाची 17 जानेवारीला शिक्षेवर सुनावणी

    NHRC Notice : ट्रेनमध्ये नॉनव्हेज अन्न वाढल्याबद्दल रेल्वेला नोटीस; NHRCने म्हटले- प्रवाशांना माहिती असावे, मांस हलाल आहे की झटका

    Manoj Sinha : जम्मू-काश्मिरात 5 सरकारी कर्मचारी बडतर्फ, अतिरेक्यांशी होते संबंध; एलजी मनोज सिन्हा यांची कारवाई