PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, जर क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू अंपायरला वारंवार जाब विचारत असेल, तर समजून घ्या की, त्याच्या खेळात दोष आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणीही जर निवडणूक आयोगाला, ईव्हीएमला दोष दिला तर समजून घ्या, त्यांचा खेळ संपलाय. PM Modi Criticizes Mamata Banerjee in Hugli Rally Over Her Allegations On EC
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, जर क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू अंपायरला वारंवार जाब विचारत असेल, तर समजून घ्या की, त्याच्या खेळात दोष आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणीही जर निवडणूक आयोगाला, ईव्हीएमला दोष दिला तर समजून घ्या, त्यांचा खेळ संपलाय.
पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील एका निवडणूक रॅलीत म्हटले होते की, लोक पैशांनी भाजपच्या सभांमध्ये येत आहेत असा दावा करून दीदींनी लोकांच्या स्वाभिमानाला दुखावले. ते म्हणाले, “राजकीय स्वार्थासाठी तृणमूल कॉंग्रेसने सिंगूरकडे दुर्लक्ष केले, परिसरात कोणताही उद्योग नाही आणि शेतकरी नाराज आहेत.”
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- पश्चिम बंगालला काय हवे आहे, काय करावे याबद्दल बंगालच्या महान लोकांमध्ये कधीच गोंधळ उडालेला नाही. म्हणूनच बंगालच्या जनतेने निवडणुकांमध्ये नेहमीच स्पष्ट बहुमताला प्राधान्य दिले आहे. इथला बौद्धिक वर्ग, इथल्या अभ्यासू प्रतिभावंतांनी नेहमीच स्पष्ट विचारांना निवडले आहे.
- बंगालचे लोक नेहमीच त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ज्यांनी बंगालच्या लोकांची उपेक्षा केली, त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत, ते अपयशी ठरले आहेत. बंगालचा विकास न करणारे लोक अपयशी ठरले, त्यांनी बंगालला अनेक वर्षे मागे लोटले. म्हणूनच आज बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा परिवर्तनाचा निश्चय केलाय. आशोल पोरिबर्तनच्या घोषणेत आणि शोनार बांगलाच्या दृष्टीने ही बंगालमधील लोकांची आकांक्षा आहे. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील मतदानातून त्यांनी भाजपच्या प्रचंड बहुमताचा मार्ग मोकळा केला आहे.
- दोन दिवसांपूर्वी नंदीग्राममध्ये 2 मे रोजी काय निकाल लागणार आहेत, याची झलक आम्ही पाहिली आहे. मला खात्री आहे की, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात दीदींची चिडचिड वाढेल, माझ्यावर शिव्यांचा वर्षावही वाढेल.
- बंगालला एक खास मधुरता आहे. इथल्या भाषेत गोडवा आहे. येथे बंधू-भगिनींच्या भावनेत गोडवा आहे, वागण्यात गोडपणा आहे. मिष्टी डोई आणि मिठाई तर बातच न्यारी! पण मग दीदींमध्ये एवढी कटुता कुठून येते?
PM Modi Criticizes Mamata Banerjee in Hugli Rally Over Her Allegations On EC
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीमुळे 7 जण दगावले, 23 गंभीर आजारी, आरोग्य नियामकांची माहिती
- कोरोना संक्रमित फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली माहिती
- IPL 2021 : आयपीएलवर कोरोनाचे सावट, वानखेडे स्टेडियमचे 8 ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह
- Corona Outbreak : ब्राझीलमध्ये मृतदेह पुरण्यासाठी कमी पडतेय जागा, कबरी रिकाम्या करून दफनविधी
- Lockdown In Bangladesh : बांग्लादेशात कोरोनाचा भयंकर उद्रेक, देशात 5 एप्रिलपासून 7 दिवसांचे लॉकडाऊन