विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशातल्या कोव्हिड स्थितीचा आढावा घेणार आहेत. काही उच्च स्तरीय बैठकांमध्येही सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी शुक्रवारचा पश्चिम बंगालचा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.PM Modi cancels all his Bengal rallies on Friday, cites ongoing COVID-19 situation
23 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगालमध्ये चार सभांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण या ठिकाणी त्यांच्या सभा होत्या. बंगालमध्ये या सगळ्या सभांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र आता या सगळ्या सभा रद्द करण्यात झाल्या आहेत. शुक्रवारी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये उद्या जाणार नाहीत.
उद्या घेणार महत्त्वाच्या बैठका :-
- सकाळी 9 वाजता देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक होणार आहे.
- सकाळी 10 वाजता राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत ते बैठक करणार आहेत त्यामध्ये ते ऑक्सिजनचा तुटवडा कुठे कुठे भासतो आहे आणि काय उपाय योजता येतील याबाबत चर्चा करणार आहेत. ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.
- दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातल्या प्रमुख ऑक्सिजन उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. ही चर्चाही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार सभा होणार होत्या. या ठिकाणी टेंट, खुर्च्या, झेंडे, बॅनर्स अशी सगळी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र आता या सगळ्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढते आहे. तसंच लसींचाही तुटवडा भासतो आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये रूग्णांचे मृत्यूही वाढत आहेत. तर कोरोनाही वाढतो आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काही बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
PM Modi cancels all his Bengal rallies on Friday, cites ongoing COVID-19 situation