• Download App
    केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारांसोबत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी करताय दिवसातील १८ ते १९ तास काम ।piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in this corona situation

    केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारांसोबत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी करताय दिवसातील १८ ते १९ तास काम

    केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये स्पष्ट मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत दिवस रात्र काम करत आहे.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली:  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजविला आहे. मागील सलग काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारांसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत.केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याचे केंद्रीय पियुष गोयल यांनी म्हटले आहे. piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in this corona situation



    त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन गोयल यांनी केले. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी ते बोलत होते. पियुष गोयल यांनी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात असल्याची माहिती दिली.

    पियुष गोयल यांनी या मुलाखतीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असलेल्या भेदभावाच्या आरोपावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचं पाहून मला फार वाईट वाटलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार कोणताही भेदभाव न करता लढत आहे. या विषयाला जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही लोकं राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून मला फार वाईट वाटतं असं गोयल यांनी म्हटलं आहे.

    कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये सहा हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवला जाणार असून सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, असंही गोयल यांनी सांगितले.केंद्र सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे राज्य सरकारांना मदत करण्यासाठी सतत काम करत आहे. त्यांनी मला रात्री एक वाजता कॉल करुन सर्व माहिती घेतली,” असंही गोयल म्हणाले.

    piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in this corona situation

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य