विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी नव्या उच्चांकांना स्पर्श केला आहे. देशभरात पेट्रोल ३५ पैसे प्रतिलिटर; तर डिझेल ९ पैशांनी महाग झाले. देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोलच्या प्रतिलिटर दराने १०० चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लडाख, सिक्कीम, पुदुच्चेरी या राज्यांत इंधनांच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. Petrol prices risen
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दरावर सरकारने नियंत्रण आणले होते; मात्र ही निवडणूक संपताच ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल ३७ वेळा वाढ करण्यात आली आहे. या काळात पेट्रोल १०.१६ रुपये प्रति लिटरने; तर डिझेलचे दर ८.८९ रुपयांनी वाढले आहेत.
मुंबईत पेट्रोलचा दर १००.५६ रुपये प्रतिलिटर; तर दिल्लीत हा दर १०६.५९ रुपये आहे. डिझेलचे मुंबईत प्रतिलिटर दर ९७.१८ रुपये असून दिल्लीत ८९.६२ रुपये दर आहेत. सरकारी तेल कंपन्यांकडून तेल व नैसर्गिक वायूच्या उत्पादनात मागणीच्या तुलनेत वाढ होत नसल्याने भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व वाढत आहे.
Petrol prices risen
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीरच्या वादात आता इस्लामिक देशांची संघटनाही, भारतात मुस्लिमांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप
- भाजपाच्या तामीळनाडू प्रदेशाध्यक्षपदी के. अन्नामलाई, एल. मुरुगन यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने दिला राजीनामा
- दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचा सांत्वनपर फोन, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली
- पुणे जिल्ह्याला आत्तापर्यंत मिळाले कोरोना प्रतिबंधक लसीचे ५० लाख डोस, आत्तापर्यंत १९.६८ लाख नागरिकांना पहिला डोस
- स्मृति इराणी यांच्या महिला व बालकल्याण विभागाचा सुपोषित इंडियाचा नारा, पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण