• Download App
    पेट्रोल – डिझेलचे भाव भडकलेले असताना किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती । Petrol - Central government's efforts to keep diesel prices stable while prices are skyrocketing; Information of Petroleum Minister Hardeep Singh Puri

    पेट्रोल – डिझेलचे भाव भडकलेले असताना किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एकीकडे पेट्रोल – डिझेलचे भाव भडकून त्यांनी शंभरी पार केली असताना त्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले. Petrol – Central government’s efforts to keep diesel prices stable while prices are skyrocketing; Information of Petroleum Minister Hardeep Singh Puri

    दिल्लीत आज पेट्रोलचे भाव ३५ पैशांनी वाढून ते एका लिटरला १०५.८४, तर डिझेलचे भाव ९४.५७ रूपये झाले, तर मुंबईत हेच भाव ३४ पैशांनी वाढून पेट्रोलला १११.७७ रूपये झाले, तर डिझेलचे भाव एका लिटरला ३७ पैशांनी वाढून १०२.५२ रूपये झाले.

    पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याची कबुली पेट्रोलिमय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली, त्याचवेळी त्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती देखील दिली. कोविड नंतरच्या काळात पेट्रोलचा वापर १० ते १५ टक्क्यांनी वाढला, तर डिझेलचा वापर ६ ते १० टक्क्यांनी वाढला. केंद्र सरकार या दरवाढीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे हरदीप सिंग पुरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

    Petrol – Central government’s efforts to keep diesel prices stable while prices are skyrocketing; Information of Petroleum Minister Hardeep Singh Puri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती