baba ramdev : अॅलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन आणि डॉक्टरांना लक्ष्य करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. petition in muzaffarpur court demanding to file sedition case against baba ramdev
वृत्तसंस्था
मुजफ्फरपूर : अॅलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन आणि डॉक्टरांना लक्ष्य करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ज्ञान प्रकाश यांनी आपले वकील सुधीर कुमार ओझा यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी अनेक राजकारणी, बॉलिवूड स्टार आणि परदेशातील हस्तींविरोधात याचिका दाखल करून ज्ञानप्रकाश चर्चेत आले होते.
कार्यवाहक सीजेएम शैलेंद्र राय यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून रामदेव यांचे म्हणणे फसवे असल्याचे म्हटले आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याव्यतिरिक्त देशद्रोह आणि फसवणुकीसंबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 7 जून रोजी होईल.
पतंजली समूहाचे संस्थापक योगगुरू रामदेव यांचे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कोरोना लसीसंदर्भातील विधान सध्या वादग्रस्त ठरलेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) देखील रामदेवविरोधात मोर्चेबांधणी करत आहे. रामदेव डॉक्टरांची बदनामी करत असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. कोरोना काळातही अनेक डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत, त्यानंतरही या पवित्र व्यवसायाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
petition in muzaffarpur court demanding to file sedition case against baba ramdev
महत्त्वाच्या बातम्या
- मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकामध्ये आहेत सीबीआयच्या या डॅशिंग महिला अधिकारी
- राहुल गांधींनी एका दिवसात ट्विटरवरून अनेक नेत्यांना – पत्रकारांना केले अनफॉलो
- Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रायलची गरज नाही
- मुंबईतील CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वेसह नऊ कंपन्या स्पर्धेत