• Download App
    शिक्षणाची जिद्द : काश्मीरच्या हंदवाडातील परवेज एका पायावर शाळेत!!|Perseverance of education: Pervez from Handwada, Kashmir is in school on one foot

    शिक्षणाची जिद्द : काश्मीरच्या हंदवाडातील परवेज एका पायावर शाळेत!!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : संवेदनशील माणसाला प्रगतीची आस स्वस्थ बसू देत नाही. आपल्यातली कमी तो जिद्दीने भरून काढतो आणि समाजासाठी प्रेरणा ठरतो.Perseverance of education: Pervez from Handwada, Kashmir is in school on one foot

    अशीच जिद्द जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा मधील परवेज अहमद हाजम विद्यार्थी दाखवतो आहे. परवेज दिव्यांग आहे. तो घरापासून तब्बल दोन किलोमीटर आंतर एका पायावर कापून रोज शाळेत जातो. त्याचे मित्र त्याला मदतीला पुढे असतात. परंतु रोज एका पायावर शाळेत जाणारे मी खूप दमतो. रस्त्यात मध्ये कुठेतरी बसतो पण सध्या रस्त्यांची हालत खराब आहे. जर मला कुठली मदत मिळाली कृत्रिम पाय मिळू शकला तर मी चालू शकतो, असे परवेजने एन आय या वृत्तसंस्थेला सांगितले.



    वृत्तसंस्थेने परवेज याचे म्हणणे ट्विट केले. हे ट्विट अमेरिकेतील जयपूर फूट उपक्रमाचे अध्यक्ष प्रेम भंडारी यांनी पाहिले आणि त्यांनी परवेज याला जयपूर फूट देण्याचे आश्वासन दिले आहे. परवेज याला जयपूर फूट मिळाला तर त्याची शैक्षणिक जिद्द त्याआधी वेगाने पुढे घेऊन जाऊ शकते.

    मला जीवनात काही स्वप्ने साकार करायची आहेत. त्यासाठी दिव्यांग असूनही मी रोज शाळेत जातो असे परवेजने सांगितले आहे. ही जिद्द त्याला पुढे नेणार आहे, असे प्रेम भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.

    Perseverance of education: Pervez from Handwada, Kashmir is in school on one foot

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल

    India Pakistan : भारत-पाकिस्तानने एकमेकांना अणु ठिकाणांची माहिती दिली; 35 वर्षांची जुनी परंपरा; ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ल्याची अफवा

    Indore : पाईपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी; इंदूरमध्ये घातक जिवाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला