वृत्तसंस्था
श्रीनगर : संवेदनशील माणसाला प्रगतीची आस स्वस्थ बसू देत नाही. आपल्यातली कमी तो जिद्दीने भरून काढतो आणि समाजासाठी प्रेरणा ठरतो.Perseverance of education: Pervez from Handwada, Kashmir is in school on one foot
अशीच जिद्द जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा मधील परवेज अहमद हाजम विद्यार्थी दाखवतो आहे. परवेज दिव्यांग आहे. तो घरापासून तब्बल दोन किलोमीटर आंतर एका पायावर कापून रोज शाळेत जातो. त्याचे मित्र त्याला मदतीला पुढे असतात. परंतु रोज एका पायावर शाळेत जाणारे मी खूप दमतो. रस्त्यात मध्ये कुठेतरी बसतो पण सध्या रस्त्यांची हालत खराब आहे. जर मला कुठली मदत मिळाली कृत्रिम पाय मिळू शकला तर मी चालू शकतो, असे परवेजने एन आय या वृत्तसंस्थेला सांगितले.
वृत्तसंस्थेने परवेज याचे म्हणणे ट्विट केले. हे ट्विट अमेरिकेतील जयपूर फूट उपक्रमाचे अध्यक्ष प्रेम भंडारी यांनी पाहिले आणि त्यांनी परवेज याला जयपूर फूट देण्याचे आश्वासन दिले आहे. परवेज याला जयपूर फूट मिळाला तर त्याची शैक्षणिक जिद्द त्याआधी वेगाने पुढे घेऊन जाऊ शकते.
मला जीवनात काही स्वप्ने साकार करायची आहेत. त्यासाठी दिव्यांग असूनही मी रोज शाळेत जातो असे परवेजने सांगितले आहे. ही जिद्द त्याला पुढे नेणार आहे, असे प्रेम भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.
Perseverance of education: Pervez from Handwada, Kashmir is in school on one foot
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया
- Kashmir targeted killings : हे आहे वास्तव!!; हालात सुधरे, आतंकी बिगडे!!
- राज्यसभा निवडणूक 2022 : महाराष्ट्रात 1998 ची पुनरावृत्ती होणार??; काँग्रेसचे राम प्रधान झाले होते पराभूत!! मग यंदा पडेल कोण??
- औरंगाबाद, उस्मानाबादचे खरंच नामांतर??, की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी चर्चेची नुसतीच पुडी??