वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ‘ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता त्यांनी अधिक कष्टाचे कोणतेही काम करणे टाळले पाहिजे. अशा लोकांनी एक किंवा दोन वर्षांपर्यंत व्यायाम, धावणे, जॉगिंग आदी करू नये.’ गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल मांडवियांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘आयसीएमआरने यावर एक संशोधन केले आहे. त्यानुसार, ज्या लोकांना जास्त संसर्ग होता त्यांनी श्रम टाळले पाहिजेत.’People with acute corona should exercise with caution; ICMR’s research report on post-corona outcomes
आयसीएमआरने १४ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर संशोधन केले होते. त्यानुसार, ज्यांना कोरोनाचा संसर्ग एकापेक्षा जास्त वेळा झाला व रुग्णालयात दाखल व्हावे लागले अशा लोकांपैकी ६.५% लोकांचा मृत्यू झाला. मात्र, जे कोरोनातून सावरले, त्यांच्या रिकव्हरीचा दर वेगवान राहिला. ते आता सहजपणे धावू शकत आहेत. तथापि, जे कोरोनासह आधीपासूनच इतर आजारांनी ग्रस्त होते त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांना कोरोना झाला तेव्हा त्यांच्यावर याचा गंभीर परिणाम झाला. अशा रुग्णांनी कष्टाची कामे करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये हृदयाचे ठोके जलद होतात अशी कामे त्यांनी करू नये. हे स्पष्ट झाले आहे की, ज्यांना फक्त कोरोना होता व रिकव्हर झाले त्यांनी नियमित व्यायाम करावा. ज्यांना इतर गंभीर आजार आहेत त्यांनीच कठीण व्यायाम करण्याचे टाळले पाहिजे.
श्वास घेताना त्रास होत असेल तर सावध व्हा
हृदय शरीरात रक्त पंप करते. तुम्ही व्यायाम किंवा नृत्य करता तेव्हा पंपिंगचा वेग वाढतो. रक्तदाब वाढतो. तसेच हृदयगतीही वाढते. अशा स्थितीमध्ये शरीराला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, कोरोनामुळे हृदयाला नुकसान झाले असेल किंवा हृदय पूर्णपणे निरोगी नसेल तेव्हा हार्ट अटॅकची शक्यता वाढते. श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागतो तेव्हा असे हृदयाशी संबंधित समस्येमुळे होऊ शकते.
People with acute corona should exercise with caution; ICMR’s research report on post-corona outcomes
महत्वाच्या बातम्या
- Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!
- मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय
- बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक
- अमृता खानविलकरची ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण!