• Download App
    घराणेशाहीच्या पक्षांना जनता नाकारतेय, कॉँग्रेस पुढील काळात जिल्ह्याचा पक्ष राहिल, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल|People reject dynastic parties, Congress will remain district party in future, says Assam CM

    घराणेशाहीच्या पक्षांना जनता नाकारतेय, कॉँग्रेस पुढील काळात जिल्ह्याचा पक्ष राहिल, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकेकाळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कॉँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. पुढील काळात कॉँग्रेस केवळ जिल्ह्याचा पक्ष राहिल अशी टीका त्यांनी केली आहे.People reject dynastic parties, Congress will remain district party in future, says Assam CM

    सरमा म्हणाले, पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांत मतदारांनी घराणेशाही आणि जातीयवादी पक्षांना नाकारले आहे. येत्या 4-5 वर्षात भारतात जातीयवादी आणि कौटुंबिक पक्ष नाहीसे होतील आणि विकासाचे राजकारण सुरू होईल. 2026 पर्यंत काँग्रेस हा प्रमुख राजकीय पक्ष असणार नाही तर, जिल्ह्याचा पक्ष म्हणून तो कायम राहील.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास या निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या निवडणुकीतही भाजपचा ‘विजय रथ’ पुढे जात राहील, असे विश्वास सरमा यांनी व्यक्त केला.

    उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला गड राखला आहे. मागच्या वेळेपेक्षा कमी जागा आल्या असल्या तरीही निर्विवाद बहुमत भाजपला मिळालं आहे. भाजपाने 255 जागांवर आपली मोहोर उमटवली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या समाजवादी पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. भाजपला एकूण मतांपैकी 41.29 टक्के मते प्राप्त झाली आहेत. तर समाजवादी पक्षाला 32.03 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते प्राप्त झाली आहे.

    People reject dynastic parties, Congress will remain district party in future, says Assam CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले