• Download App
    अफगाणिस्तानात तालिबान आल्याबरोबर मेहबूबांना सुरसुरी; म्हणाल्या, मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते!! पंतप्रधान मोदींनी दिली धमकी PDP chief Mehbooba Mufti dares PM Narendra Modi to behave himself on jammu and kashmir

    अफगाणिस्तानात तालिबान आल्याबरोबर मेहबूबांना सुरसुरी; म्हणाल्या, मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते!! पंतप्रधान मोदींनी दिली धमकी

    प्रतिनिधी

    पुणे – अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबरोबर जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुरसुरी आली आहे. त्यांनी याच मोठ्या आढ्यताखोरीतून केंद्रातल्या मोदी सरकारलाच धमकी दिली आहे. काश्मीरींना छोटे समजू नका. मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते, अशा शब्दांत त्यांनी मोदींना धमकावले. PDP chief Mehbooba Mufti dares PM Narendra Modi to behave himself on jammu and kashmir

    अफगाणिस्तानात पाहा अमेरिकेला कसा गाशा गुंडाळू न जावे लागले. तुम्ही आम्हाला कमी समजू नका. तुम्ही काश्मीरी जनतेशी लवकरात लवकर बोला, असे मेहबूबांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्यांनी मोदी सरकारला थेट धमकी दिली आहे. शेजारील देशात पाहा कशाप्रकारे शक्तीशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.



    मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका? सुधारा, सांभाळा शेजारी काय होतेय ते पाहा. एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावे लागले. तुम्हाला अजूनही संधी आहे.

    ज्याप्रकारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटले आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचे चित्र तुम्ही खराब केले आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल, अशा शब्दांमध्ये मेहबूबा मुफ्तींनी मोदी सरकारला धमकी दिली.

    PDP chief Mehbooba Mufti dares PM Narendra Modi to behave himself on jammu and kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Land-for-Job Case: लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबासह 40 जणांवर आरोप निश्चित; लालू-राबडी, तेजस्वी-मीसा, हेमा-तेजप्रताप यांच्यावर खटला चालणार

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही