काठमांडू – नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथाचे मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने हे मंदिर २३ एप्रिलपासून बंद करण्याणत आले होते. Pashupatinath temple opens for people
मंदिर खुले झाल्यानंतर सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती. एका वेळेला केवळ २५ भाविकांनाच आत सोडण्यात येत होते, असे पशुपति परिसर विकास ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकारी रेवती रमण अधिकारी यांनी सांगितले.
मंदिर चार महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आल्याने काल ‘क्षमा पूजा’ करण्यात आली.नेपाळमध्ये सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. पशुपतिनाथ मंदिर परिसर हा नेपाळमधील सर्वांत मोठा आहे.
Pashupatinath temple opens for people
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!
- उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री बदलले भाजपने; स्वतःकडे श्रेय घेतले आम आदमी पार्टीने…!!
- उत्तर महाराष्ट्राशी सापत्नभाव; पूरग्रस्तांच्या निधीवरून छगन भुजबळ – सुहास कांदे भर बैठकीत खडाजंगी; पण राजकीय वैर जुनेच!!
- CONGRESS VS NCP : कॉंग्रेस होती आता नाही- ‘काँग्रेस ‘त्या’ जमीनदारासारखी’ शरद पवारांच्या विधानावर स्मृती इराणींनी घेतली डबल फिरकी ….