• Download App
    उत्तर प्रदेश डेंगीच्या तापाने फणफणला, डेंगीचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ| Dengi fever increased in UP

    उत्तर प्रदेश डेंगीच्या तापाने फणफणला, डेंगीचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशात डेंगीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल २६३ रुग्णांची नोंद झाली, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.डेंगीचा नवा प्रकार प्रामुख्याने मथुरा आणि आग्र्यामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्या दोन शहरांत घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे. Dengi fever increased in UP

    गाझियाबादमध्येही तापाचे रुग्ण वाढल्याने दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत फिरोजाबादमध्ये डेंगीमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य आरोग्यविभागाने म्हटले आहे.उत्तर प्रदेशात डेंगीचा नवा प्रकार `डी-२` आढळून आला आहे.



    आयसीएमआरने ही माहिती दिली आहे. डेंगीच्या नव्या रुग्णांपैकी १७० रुग्ण हे एकट्या फिरोजाबादमधील आहेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १९०० जणांना डेंगी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

    Dengi fever increased in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल