• Download App
    जय भीम सिनेमातील पार्वती यांची खऱ्या आयुष्यातील सद्यस्थिती अतिशय बिकट! | Parvati's real life situation from Jai Bhim movie is very bad!

    जय भीम सिनेमातील पार्वती यांची खऱ्या आयुष्यातील सद्यस्थिती अतिशय बिकट!

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : सिनेमा फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नसतो. बऱ्याच सिनेमात समाजाचं वास्तविक क्रूर रूपही दाखवले जाते. कर्णन, असुरन, द ग्रेट इंडियन किचन या सारख्या साऊथ इंडियन सिनेमांनी सिनेमाची एक वेगळी व्याख्या बनवली आहे. समाजातील बऱ्याच अश्या गोष्टी ज्या मुक्तपणे बोलण्यास आपण आजही दोन वेळा विचार करतो, त्या विषयांवर साऊथमध्ये सिनेमे बनवले जात आहेत. आणि जेव्हा बॉलिवूड मधील दिगग्ज अभिनेते आजही फक्त मसाला मुव्ही बनवून आपला बँक बॅलन्स वाढवण्याचा विचार करत आहेत तिथे साऊथ मधील सुपरस्टार अभिनेते अश्या सामाजिक विषयांच्या सिनेमात प्रमुख भूमिका करताना दिसून येत आहेत आणि ही गोष्ट अतिशय सुखद आहे.

    Parvati’s real life situation from Jai Bhim movie is very bad!

    तमिळ सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका असणारा ‘जय भीम’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जातीयवाद आणि भेदभाव यावर आधारित हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

    तमिळनाडूमधील एका आदिवासी माणसावर खोटा चोरीचा आरोप आणला जातो. त्या आरोपाखाली तुरुंगामध्ये पोलिसांकडून त्याचा छळ केला जातो. त्यातच त्याचा मृत्यू होतो. त्याच्या पश्चात त्याची बायको पार्वती मात्र त्याच्यासोबत झालेल्या कठोर, क्रूर, अमानवीय अन्याया विरुद्ध दाद मागण्यासाठी जिवंत राहते. आपल्या मृत पतीला न्याय मिळावा म्हणून ती एका वकिलाला गाठले. आणि शेवटी तिला न्याय मिळतो. अशी कथा या सिनेमामध्ये दाखविण्यात आली आहे.

    या सिनेमाच्या शेवटी पार्वती म्हणजे मृत आदिवासी व्यक्तीची बायको हिला सरकारकडून नुकसानभरपाई आणि गावाच्या मध्यवर्ती भागात राहण्यासाठी जागा देण्यात येईल असा आदेश कोर्टाने दिला आहे. असे दाखवण्यात आले आहे. पण 25 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पार्वतीची सध्याची सत्यपरिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. ना तिला घर मिळाले ना सरकार कडून कोणती मदत. हा आपला भारत देश.


    ‘जय भीम’ या जस्टिस चंद्रू यांच्या मानवी हक्कासाठी दिलेल्या लढाईवर आधारित सिनेमाची सत्यकथा


    पार्वती सध्या चेन्नई येथे एका छोट्याशा झोपडीमध्ये राहाते. ही झोपडी देखील तिने भाड्याने घेतलेली आहे. या झोपडीच्या आजूबाजूला बऱ्याच वेळा पूरपरिस्थिती उद्भवलेली असते. जेवण बनवण्यासाठी अपुऱ्या सोयीसुविधा आहेत त्यामुळे झोपडीच्या बाहेरच बऱ्याच वेळा चुलीवर जेवण बनवावे लागते. पाऊस असो, ऊन असो झोपडीच्या बाहेरच तिला जेवण बनवावे लागते.

    शौचालयांची देखील कोणतीही व्यवस्था नाहीये. एक मीटर चालून गेल्यानंतर शौचालयाची व्यवस्था आहे. मुख्य रस्त्यावरून या झोपडीपर्यंत जाण्यासाठीचे रस्ते देखील अतिशय अरूंद आहेत. पार्वती यांचा नातू सांगतो, या झोपडीच्या मालक बऱ्याचवेळा शेणखत बाहेर टाकल्यामुळे नेहमीच दुर्गंधीयुक्त जागेमध्ये पार्वती यांना राहावे लागत आहे. तमिळ वृत्तवाहिनी ‘गल्लत तमिळ’ ने खऱ्या आयुष्यातील पार्वतीला गाठून तिची ही भयानक अवस्था आपल्यासमोर आणली आहे.

    अशा भयानक स्थितीमध्ये पार्वती सध्या आपले आयुष्य काढत आहेत. आणखी एका न्यूज चॅनलने पार्वती यांची ही अवस्था जगासमोर आणली आहे. त्यानंतर अॅक्टर, डिरेक्टर, कोरियोग्राफर राघव लॉरेन्स यांनी तिच्यासाठी घर बांधून देणार असे वचन दिले आहे. पार्वती आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून इतर कोणत्याही मदतीची अपेक्षा नाहीये. तर त्यांना राहण्यासाठी एक छोटेसे घर हवे आहे.

    Parvati’s real life situation from Jai Bhim movie is very bad!

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!