• Download App
    सभेतील भाषणादरम्यान बेशुद्ध झाला कार्यकर्ता, पंतप्रधान मोदींनी मदतीसाठी पाठवली डॉक्टरांची टीम । Party Worker fainted during the speech of PM Modi in Assam, immidiatly PMO sent Medical team for help

    सभेतील भाषणादरम्यान बेशुद्ध झाला कार्यकर्ता, पंतप्रधान मोदींनी मदतीसाठी पाठवली डॉक्टरांची टीम

    PM Modi in Assam  : आसाममधील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विविध सभा घेत आहेत. शनिवारी त्यांनी आसामच्या तामुलपूरमध्ये सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे भाजप कार्यकर्ते व समर्थकांसाठी दक्षता दिसून आली. या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला. यावर पंतप्रधानांनी लगेच त्यांच्या मदतीसाठी डॉक्टरांची टीम पाठविली. Party Worker fainted during the speech of PM Modi in Assam, immediately PMO sent Medical team for help


    विशेष प्रतिनिधी

    तामुलपूर : आसाममधील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विविध सभा घेत आहेत. शनिवारी त्यांनी आसामच्या तामुलपूरमध्ये सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे भाजप कार्यकर्ते व समर्थकांसाठी दक्षता दिसून आली. या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला. यावर पंतप्रधानांनी लगेच त्यांच्या मदतीसाठी डॉक्टरांची टीम पाठविली.

    पंतप्रधान मोदी या रॅलीला संबोधित करत होते. त्याचवेळी बहुधा पाणी न प्यायल्याने एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला होता. पंतप्रधानांचे तिकडे लक्ष जाताच त्यांनी आपले भाषण थांबवले आणि त्यांच्या तैनातीत असलेल्या वैद्यकीय पथकाला मंचावरूनच मदत करण्याची सूचना केली. मंचावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पीएमओच्या मेडिकल टीमने तेथे जावे. बहुधा पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना त्रास झालाय, त्यांची त्वरित मदत करा.’ ते म्हणाले की, जे डॉक्टर माझ्याबरोबर आले आहेत, त्यांनी त्या सहकाऱ्याची मदत करावी. त्यांना पाण्याच्या कमतरतेमुळे त्रास झालाय.

    यानंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा आपले भाषण सुरू केले. त्यांनी सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, जर आम्ही समाजात भेदभाव केला, समाजाचे तुकडे करून आपल्या व्होटबँकेसाठी काही दिले, तर दुर्भाग्य पाहा, त्याला देशात सेक्युलॅरिझम म्हणतात. पण जर आम्ही प्रत्येकासाठी काम केले, कोणताही भेदभाव पाळला नाही, तर त्याला मात्र हे कम्युनल म्हणतात.’ ते म्हणाले की, आमचा तर मंत्रच आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हा जो सेक्युलॅरिझम-कम्युनलचा खेळ आहे, यानेच देशाचे मोठे नुकसान केलेले आहे.

    Party Worker fainted during the speech of PM Modi in Assam, immediately PMO sent Medical team for help

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या