• Download App
    पक्षाचे सचिव एसजी सूर्या यांना अटक, भाजपचा हल्लाबोल, अन्नामलाई म्हणाले - निरंकुश होत आहेत स्टॅलिन |Party secretary SG Surya arrested, BJP attacked, Annamalai said - Stalin is becoming autocratic

    पक्षाचे सचिव एसजी सूर्या यांना अटक, भाजपचा हल्लाबोल, अन्नामलाई म्हणाले – निरंकुश होत आहेत स्टॅलिन

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव एसजी सूर्या यांना मदुराईच्या सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक शुक्रवारी रात्री झाली, त्यानंतर भाजपने सीएम स्टॅलिन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी एसजी सूर्याच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन निरंकुश शासनाकडे वाटचाल करत असल्याचा आरोप केला.Party secretary SG Surya arrested, BJP attacked, Annamalai said – Stalin is becoming autocratic

    अण्णामलाई यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

    तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी ट्विट केले की, ‘भाजपचे राज्य सचिव एसजी सूर्या यांची अटक निंदनीय आहे. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी द्रमुकच्या मित्रपक्ष कम्युनिस्टांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश केला. राज्याच्या यंत्रणेचा वापर करून भाषणस्वातंत्र्य खोडून काढणे आणि क्षुल्लक टीकेवर चिडचिड करणे हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्याला शोभत नाही. अर्थात ही एक निरंकुश नेत्याची ओळख आहे. एमके स्टॅलिन राज्याला अराजक जंगलात रूपांतरीत करत आहेत पण ही अटक आपल्याला परावृत्त करणार नाही आणि आम्ही कटू सत्य बोलतच राहू.”



    कोणत्या प्रकरणात अटक

    वास्तविक, भाजपचे प्रदेश सचिव एसजी सूर्या यांनी यापूर्वी मदुराईचे खासदार व्यंकटेशन यांच्याविरोधात एक ट्विट केले होते. यापूर्वी नाला साफ करताना एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत ट्विट करत भाजप नेत्याने खासदारावर या दिशेने पुरेशी कारवाई न केल्याचा आरोप केला. भाजपच्या नेत्याने खासदारांना कठोर शब्दांत पत्रही लिहिलं आहे. त्यानंतरच एसजी सूर्या यांना अटक करण्यात आली आहे.

    डीएमके सरकारचे मंत्री सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केल्यापासून भाजप द्रमुकवर हल्लाबोल करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई सीएम स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका केली आहे.

    Party secretary SG Surya arrested, BJP attacked, Annamalai said – Stalin is becoming autocratic

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र