• Download App
    संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी जाहीर|Parliamentary Ratna Award for Supriya Sule for the seventh year in a row

    संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी जाहीर

     

    नवी दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याही वर्षी जाहीर झाला आहे. खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सुळे यांनी सलग सातव्या वर्षी पटकावला असून गेल्या वर्षी त्यांना याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.Parliamentary Ratna Award for Supriya Sule for the seventh year in a row

    लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे.



    गेल्या बारा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू १७व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

    Parliamentary Ratna Award for Supriya Sule for the seventh year in a row

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nirav Modi : फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते; युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

    Microsoft : मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

    राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!