विमानतळ पोलिसांनी प्रवासी संबिधत प्रवाशाला ताब्यात घेतले आणि…
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या विमानामध्ये 27 वर्षीय प्रवाशाने सीटखाली बॉम्ब असल्याचे सांगताच गोंधळ उडाला. प्रवाशाने हे सांगताच एजन्सी अलर्ट मोडवर आल्या आणि विमानात घबराट पसरली.Panic in the flight from Mumbai to Lucknow passenger said bomb under my seat
मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये 27 वर्षीय मोहम्मद अयुबने सांगितले की, त्याच्या सीटखाली बॉम्ब ठेवण्यात आला आहे. यानंतर सर्व यंत्रणांनी तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलण्यात आली आणि कसून तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 5264 मध्ये बसलेल्या एका प्रवाशाने असे सांगितले. विमानतळ पोलिसांनी प्रवासी अयुबला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध कलम ५०६(२) आणि ५०५(१)(बी) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रवाशाने असे का केले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Panic in the flight from Mumbai to Lucknow passenger said bomb under my seat
महत्वाच्या बातम्या
- समलैंगिक भागीदार प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्पष्ट केले मत, म्हटले…
- ज्ञानवापींच्या तीन शिलालेखांमध्ये आश्चर्यकारक खुलासे!
- हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले…
- राहुल गांधींनी काढली भारत जोडो न्याय यात्रा; पण INDI आघाडीत वाढला वजाबाकीचाच आकडा!!