• Download App
    मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाकडून संताप, म्हणाले मंदिराऐवजी मशीद पडली असती तर काय प्रतिक्रिया उमटली असती याचा विचार करा|Pakistan's Supreme Court is angry over the police's failure to protect the temple. said Think about the reaction if the mosque had fallen instead of the temple

    मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाकडून संताप, म्हणाले मंदिराऐवजी मशीद पडली असती तर काय प्रतिक्रिया उमटली असती याचा विचार करा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मंदिर पाडले गेल्याने हिंदूंना काय वाटले असेल याचा विचार करा. कल्पना करा की, मशीद पाडली गेली असती तर मुस्लिमांची काय प्रतिक्रिया असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.Pakistan’s Supreme Court is angry over the police’s failure to protect the temple. said Think about the reaction if the mosque had fallen instead of the temple

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात जमावाने हिंदू मंदिराची तोडफोड केली. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने दोषींना त्वरित अटक करण्याचे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आदेश दिले. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिष्ठा खराब झाली आहे, असे म्हणत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळाचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांची निंदा केली.



    बुधवारी शेकडो लोकांच्या जमावाने भोंग येथील मंदिराची तोडफोड केली. पाकिस्तान हिंदू परिषदेचे आश्रयदाता डॉ.रमेश कुमार यांना पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी स्वत: बोलावून घेत या घटनेची दखल घेतली. पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) इनाम गनी यांना घटनेच्या अहवालासह सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.

    मंदिरावर हल्ला झाला तेव्हा प्रशासन आणि पोलीस काय करत होते याविषयी न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना घनी म्हणाले, प्रशासनाची प्राथमिकता मंदिराभोवती राहत असलेल्या हिंदू घरांचे संरक्षण करणे होते.सरन्यायाधीश यावर म्हणाले की, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काम करू शकत नसल्यास त्यांना काढून टाकले पाहिजे.

    तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेसंदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश म्हणाले की, पोलिसांमध्ये हा तपास करण्यासाठी उत्साहच नाही. कार्यक्षम पोलीस असते तर आत्तापर्यंत हा प्रश्न मिटला असता. गुन्हेगार मुक्त फिरत असल्याने परिसरातील हिंदूंसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

    अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी द्यायला पाहिजे.आयजीपी आणि संबंधित मुख्य सचिवांना एका आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी गाव समित्या स्थापन करा, असेही म्हटले आहे.

    Pakistan’s Supreme Court is angry over the police’s failure to protect the temple. said Think about the reaction if the mosque had fallen instead of the temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!