प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही पत्रकार हमीद मीर यांनी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. हमीद मीर यांच्या वक्तव्यामुळे आर्थिक संकट आणि गृहयुद्धाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. हमीद मीर यांचा दावा थेट काश्मीरबाबत होता, म्हणून भारतातही यावर बरीच चर्चा सुरू आहे.Pakistan’s secret agreement with India on Kashmir! Excitement due to revelations of Pakistani journalist, what was this deal? Read more…
हमीद यांनी बाजवा लष्करप्रमुख असताना भारताशी काश्मीरबाबत झालेल्या कराराचाही उल्लेख केला आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देणार होते, असा दावाही त्यांनी केला. तेही ऑगस्ट 2019 नंतर जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले होते.
जाणून घेऊया हमीद मीर यांनी काश्मीर आणि जनरल बाजवा यांच्याबाबत काय दावा केला आहे? काश्मीरबाबत भारतासोबत कोणता करार झाला आहे? पाकिस्तानी लष्कराच्या स्थितीबद्दल काय म्हटले आहे?
हमीद मीर यांनी काय दावे केले?
पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर आणि नसिम जेहरा एका टीव्ही डिबेटमध्ये चर्चा करत होते. याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हमीद मीर म्हणतात, ‘मी फक्त काश्मीरबद्दल प्रार्थना करू शकतो. कारण जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरबाबत केलेल्या कराराचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारतासोबत झालेल्या युद्धविरामानंतर मोदींना लगेचच पाकिस्तानला भेट द्यायची होती.
मीर पुढे म्हणतात, ‘जेव्हा परराष्ट्र खात्याला कळले की मोदी पाकिस्तानात येत आहेत, तेव्हा परराष्ट्र मंत्री इम्रान खानकडे गेले. परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी त्यांना विचारले की तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले की बाजवा साहेब आणि फैज साहेब आले होते. अजित डोवाल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मला सांगितले. यानंतर इम्रान खान यांनी फैज साहेबांना सांगितले की, तुम्ही या प्रकरणात परराष्ट्र खात्याला सहभागी करून घ्या.
मीर म्हणाले, ‘त्यानंतर जनरल बाजवा आपल्या लवाजम्यासह परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात आले होते. इथे ते म्हणाले की आमचे रणगाडे मूव्हमेंट करण्याच्या लायक नाहीत, आमच्याकडे तोफांच्या हालचालीसाठी डिझेल नाही. पत्रकारांसमोरही त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. बाजवा यांनी 20-25 पत्रकारांसमोर आधीच सांगितले होते की, पाकिस्तानचे सैन्य भारताशी लढण्यास सक्षम नाही. त्या वेळीही ते चुकीचे बोलत असल्याची आम्हाला खात्री होती. यावर परराष्ट्र खात्याने लष्करप्रमुखांच्या बोलण्याला विरोध केला. तेव्हा जनरल बाजवा संतापले. बाजवा म्हणाले होते की, मोदी एप्रिल 2021 मध्ये पाकिस्तानला भेट देणार आहेत.
गदारोळ वाढल्यावर हमीद यांची सारवासारव
हमीद मीर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल झाला होता. देशातील वाढता वाद पाहून हमीद मीर यांना स्वतःच्या बचावासाठी ट्विट करावे लागले. हमीद यांनी लिहिले की, ‘ही स्टोरी पहिल्यांदाच एप्रिल 2021 मध्ये द हिंदू या भारतीय वृत्तपत्राने प्रकाशित केली होती. पण पाकिस्तानी मीडियातील बाजवांचे काही लोक संपूर्ण जबाबदारी इम्रान खान आणि फैज यांच्यावर ढकलत आहेत.”
Pakistan’s secret agreement with India on Kashmir! Excitement due to revelations of Pakistani journalist, what was this deal? Read more…
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला
- रिफायनरी साठी नाणार ऐवजी बारसूची जागा निवडली ठाकरे – पवार सरकारनेच; उद्धव ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल!!
- ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!
- दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट