विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : रशियन- युक्रेन वादावर भारतातील तथाकथि लिबरल्स मोदी सरकारच्या धोरणावर टीका करत आहेत. रात्रंदिवस भारताविरुध्द गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. भारताचे धोरण हे आपल्या लोकांसाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Pakistan’s Prime Minister Imran Khan has praised India’s foreign policy
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताविरुध्द नेहमीच बोलत असतात. मात्र, त्यांनी एका जाहीर सभेत भारताचे कौतुक केले. ते म्हणाले, मी आज भारताला सलाम करतो. त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाळलं आहे. आज भारताची अमेरिकेशी क्वाडमध्ये आघाडी आहे आणि निर्बंध लागू असताना ते रशियाकडून तेलही विकत घेत आहेत. कारण भारताचे धोरण आपल्या लोकांसाठी आहे.
युक्रेनच्या संकटावरून युरोपीय संघाने पाकिस्तानला दबावाखाली घेतल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, युरोपियन युनियनचे राजनैतिक अधिकारी पाकिस्तानला जे काही बोलतात, तेच भारताला सांगण्यास घाबरतात. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर त्यांनी पाकिस्तानवर रशियावर टीका करण्यासाठी दबाव आणला, पण भारताला काहीही बोलण्याचे टाळले.
इम्रान खान जेव्हापासून पाकिस्तानात सत्तेवर आले आहेत, तेव्हापासून त्यांनी सर्वत्र भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहीम सुरू केली. त्यांनी काश्मीरचा मुद्दा यूएन, ओआयसीपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
मात्र, भारताच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी सतत संवाद ठेवला आहे. त्याचबरोबर इतर देशांशीही युध्दावर तोडगा काढण्यासाठी ते बोलत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजुला अमेरिका किंवा युरोपियन महासंघाच्या दबावाला बळी पडले नाही. रशियाकडनू भारताने नुकतेच कमी किंमतीत ३० लाख बॅरल क्रुड ऑईल खरेदी केले.
Pakistan’s Prime Minister Imran Khan has praised India’s foreign policy
महत्त्वाच्या बातम्या
- NCP – AIMIM Alliance : एमआयएमशी आघाडीचा निर्णय महाराष्ट्र पातळीवर होऊ श
- The Kashmir Files : शरद पवारांकडून फारुख अब्दुल्लांची पाठराखण; सिनेमावर सामाजिक वातावरण बिघडविण्याचा आरोप!!
- गोवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २३ ते २५ मार्च दरम्यान
- Goa Dr. Pramod Sawant : भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; डॉ. प्रमोद सावंतांचे मुख्यमंत्रीपदाचे सूतोवाच