• Download App
    पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणाले, "राहुल ऑन फायर"; उत्तरे देताना राहुल गांधींची पळापळ!!|Pakistani leader Chaudhry fawad Hussain supporters rahul Gandhi, put Congress in the dock

    पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणाले, “राहुल ऑन फायर”; उत्तरे देताना राहुल गांधींची पळापळ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणतात “राहुल ऑन फायर”; पण उत्तरे देताना राहुल गांधींची झाली पळापळ!!Pakistani leader Chaudhry fawad Hussain supporters rahul Gandhi, put Congress in the dock

    त्याचे झाले असे :

    भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला प्रत्येक सभेत घेरल्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुढे येऊन तुमच्या भारताच्या निवडणुकीत पाकिस्तानला अनावश्यक ओढू नका, असा सल्ला दिला, पण हा सल्ला पाकिस्तानातच कोणी मानला नाही आणि इमरान खानच्या सरकार मधले माजी मंत्री फवाद हुसेन स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी भारताच्या निवडणुकीत नाक खुपसून बसले. ते नाक खूपसताना फवाद हुसेन यांनी राहुल गांधींच्या एका भाषणाच्या व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तर बांधले, पण तिथे सगळ्या श्रीमंतांनाच नेले. राम मंदिरात एकही दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व्यक्तीला नेले नाही, असे अशी टीका करणारा तो व्हिडिओ होता.



    त्यामुळे भारताचा खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मधल्या जाहीर सभांमधून या मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस यांना चांगलेच पट्ट्यात घेतले. शहजाद्याला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे. कारण पाकिस्तानला भारतात कमजोर सरकार हवे आहे, म्हणजे ते सरकार भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवर फक्त कागदांच्या चळती असलेल्या फाईली आणि निषेधाच्या भेंडोळ्या पाठवेल त्यापेक्षा दुसरे काही करणार नाही, हे पाकिस्तानला माहिती आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि पाकिस्तानचे वाभाडे काढले. काँग्रेस सगळीकडून या मुद्द्यावर घेरली गेली, पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांना वेगवेगळ्या टीव्ही डिबेट मध्ये त्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही.

    राहुल गांधींची आधी भाषणबाजी नंतर पळापळ

    राहुल गांधी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी प्रज्वल रेवण्णाच्या लैंगिक खेळाच्या व्हिडिओच्या मुद्द्यावर जेडीएस आणि भाजपला घेरले. प्रज्वल रेवण्णा रेपिस्ट असल्याचा आरोप केला आणि त्यासाठी मोदींनी माफी मागावी, अशी भाषणबाजी केली, पण राहुल गांधींना पत्रकारांनी फवाद हुसेन यांच्या ट्विट बद्दल प्रश्न विचारल्या बरोबर राहुल गांधी मान वळवून निघून गेले. त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. ते उत्तर देणे टाळताना राहुल गांधींची चांगलीच पळापळ झाली. कारण राहुल गांधींचे समर्थन फक्त एकट्या चौधरी फवाद हुसेन या पाकिस्तानी मंत्र्यानेच केले असे नाही, तर चिनी मीडियाने देखील राहुल गांधींचेच समर्थन केले. भारतात मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात. तिथे धर्मनिरपेक्ष सरकार यावे, असा प्रपोगंडा चिनी मीडियाने चालवून राहुल गांधींची तळी उचलून धरली. त्यामुळे एकीकडे पाकिस्तान, दुसरीकडे चीन आणि मध्ये राहुल गांधी अशी कोंडी काँग्रेसची झाली. पंतप्रधान मोदींसाठी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राहुल गांधी आणि काँग्रेसला ठोकण्याची आयती संधी मिळाली.

    Pakistani leader Chaudhry fawad Hussain supporters rahul Gandhi, put Congress in the dock

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!