विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात पाकिस्तानात जमावाने तोडफोड केलेल्या हिंदू मंदिराची दुरुस्ती केल्यानंतर हे मंदिर पुन्हा हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या भयंकर घटनेने अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते.Pakistan Temple handed over to Hindus after repairs, vandalism was carried out after bail of 8-year-old boy
सरकारी अधिकाऱ्याच्या वतीने सोमवारी या संदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासकीय अधिकारी खुर्रम शहजाद म्हणाले की, स्थानिक हिंदू लवकरच मंदिरात पूजा करण्यास सुरुवात करतील. पाच दिवसांपूर्वी मुस्लिम लोकांच्या एका गटाने पूर्व पंजाब प्रांतातील भोंग येथील मंदिरावर हल्ला केला. या लोकांनी मंदिराची तोडफोड केली आणि मुख्य गेटला आग लावली. न्यायालयाने एका ईशनिंदेचा आरोप असलेल्या आठ वर्षांच्या हिंदू मुलाला जामीन मंजूर केल्याने जमाव संतप्त झाला होता.
अटक करण्यात आलेल्या 8 वर्षीय मुलावर शाळेच्या ग्रंथालयात लघवी केल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणी इस्लामशी संबंधित धार्मिक साहित्य होते. जमावाने आरोप केला की, मुलाने ईश्वरनिंदा केली आहे, ज्याला पाकिस्तानात फाशीची शिक्षा आहे.
नंतर या प्रकरणात, डजनभर लोकांना हिंदू मंदिर पाडण्याच्या कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आणि असे सांगण्यात आले की या लोकांना मंदिराच्या दुरुस्तीसाठी पैसे द्यावे लागतील. मुस्लिम बहुल पाकिस्तानात हिंदू आणि मुस्लिम दोघेही शांततेत राहतात,
पण गेल्या काही वर्षांत हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.दुसरीकडे, अवघ्या ८ वर्षाचा अबोध मुलगा ज्याला ईश निंदा म्हणजे काय असते हे देखील माहिती नाही, त्याच्यावर खटला चालवला जात असल्याने पाकिस्तानवर जगभरातून टीकेची झोड उठली आहे.
Pakistan Temple handed over to Hindus after repairs, vandalism was carried out after bail of 8-year-old boy
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा
- मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा
- Ujjwala Yojana 2.0 ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्ज्वला योजना 2 चे लोकार्पण : मोफत स्टोव्ह ; LPG रिफिल ; कोट्यवधी नागरिकांना मिळणार फायदा
- Corona vaccine ; या आठवड्यात झायडस आणि सीरमच्या लसींना मिळू शकते तातडीच्या वापराची मंजुरी
- भारतातील परदेशी नागरिकांनाही मिळेल लस, सरकारने दिली मंजुरी, अशी असेल प्रक्रिया