जाणून घ्या, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल काय म्हणाले आणखी?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Waqf Act संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्या प्रेरित आणि निराधार असल्याचे सांगत भारत सरकारने मंगळवारी त्या फेटाळून लावल्या. पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत स्वतःच्या ‘खराब’ रेकॉर्डकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.Waqf Act
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या देशावर भाष्य करण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल.” वक्फ विधेयकावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या टिप्पणीनंतर भारताची ही प्रतिक्रिया आली आहे.
गेल्या गुरुवारी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, भारताने मुस्लिमांच्या मालमत्ता, मशिदी इत्यादी हिसकावून त्यांना विस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांना बाजूला ठेवण्यासाठी हे विधेयक आणले आहे. हे भारतातील मुस्लिम समुदायाच्या आर्थिक आणि धार्मिक अधिकारांचेही उल्लंघन आहे.
Pakistan should look at its own poor record India reprimands those who spoke against the Waqf Act
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का!